अमरावती, 14 जुलै : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या सोबत होणार नसून वेगवेगळ्या होणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी दिले तर आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विभागीय कार्यकर्ता मेळावा आज आयोजित केला आहे.
कुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा
या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आज अमरावतीत उपस्थित राहणार आहेत.
आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन!
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरिता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जी महाआघाडी तयार होणार आहे त्या महाआघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
पक्ष संघटन मजबूत कारण्यासोबतच भविष्यातील पक्षपातळीवरच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन भाजप संपूर्ण राज्यभरात करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.