दानवेंना मिळाला CBIचा रिपोर्ट; म्हणे 2 लाख 60 हजार मतांनी विजय मिळवणार!

भाजपच्या एका उमेदवाराने चक्क CBIच्या रिपोर्टचा दाखला देत आपण 2 लाख 60 हजार मतांनी विजयी होणार असल्याचे एका जाहीर सभेत सांगितले.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 11:48 PM IST

दानवेंना मिळाला CBIचा रिपोर्ट; म्हणे 2 लाख 60 हजार मतांनी विजय मिळवणार!

जालना, 24 एप्रिल: निवडणुकीत कोणाचा विजय होणार,कोणाचा पराभव होणार याचे सर्व्हे अनेक संस्था करत असतात. पण भाजपच्या एका उमेदवाराने चक्क CBIच्या रिपोर्टचा दाखला देत आपण 2 लाख 60 हजार मतांनी विजयी होणार असल्याचे एका जाहीर सभेत सांगितले. अर्थात तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, कोण आहे हा भाजपच्या उमेदवार ज्याला सीबीआयचा रिपोर्ट मिळतो. तर हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे जालन्याचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आहेत.

जालन्यात 20 एप्रिल रोजी एका सभेत बोलताना दानवे यांनी दावा केली की, मला सीबीआयचा रिपोर्ट मिळाला आहे. या रिपोर्टमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मी सर्वात लोकप्रिय उमेदवार असल्याचे म्हटले आहे. इतक नव्हे तर सिल्लोड सारख्या विधानसभा मतदारसंघात जिथे मला कमी मताधिक्य मिळते. त्या ठिकाणी यंदा 68 टक्के मिळतील तर काँग्रेसला केवळ 28 टक्के मिळतील, असे त्यांनी सांगितले.सीबीआयच्या रिपोर्टनुसार सर्वच तालुक्यात मला यंदा अधिक मते मिळणार असून या सर्व आकडेवारीचा विचार केल्यास मी यंदा 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचे दानवे म्हणाले.

दानवेंच्या या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटवर शेअर केला आहे. तर आम आदमी पक्षाने दानवे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. निवडणुकीच्या निकाला आधी सीबीआयचा अंदाज आल्याचे सांगून दानवे देशातील लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे 'आप'ने तक्रारीत म्हटले आहे. तसेच जर खरोखरच सीबीआयने अशा प्रचारचा सर्व्हे केला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी 'आप'ने केली आहे.

राज्यातील सत्तधारी पक्षाच्या अध्यशांच्या विधानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयोगाकडे केल्याचे 'आप'च्या नेत्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी रावसाहेब दानवे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


VIDEO : 'दार तोडून घरात आले आणि माझ्या भाच्याला, भावजाईला मारलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 06:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...