जवानांच्या शौर्यावर मत मागणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार- शरद पवार

जवानांच्या शौर्यावर मत मागणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार- शरद पवार

मागील निवडणुकीत 'अच्छे दिन'चे आश्वासन देणारे पंतप्रधान आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून त्यांचे सारे सहकारी करीत आहेत, हे निषेधार्ह आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधारी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव,

बारामती, 16 एप्रिल- जवानांच्या शौर्यावर मत मागणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आताच का राष्ट्रवाद आठवला का, असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. मूळ प्रश्नांवरुन लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा प्रयत्न असून ही चिंतेची बाब आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदी-इम्रान खान संबंधाबाबत शंका वाटत असल्याचे पवारांनी सांंगितले. बारामतीचं महत्त्व विरोधकांना कळालं असून मतदार त्यांना धडा शिकवतील, असं पवारांनी सांंगितले

राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सारेच जण या महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देऊन जवानांच्या शौर्याचा उपयोग सत्ता मिळविण्यासाठी करताहेत. त्यांच्याकडे आता विकासाचे म्हणून सांगण्यासारखे काहीच नाही. अर्थात त्यांच्यातीलही काही लोकांना हे पसंत नाही. मागील निवडणुकीत 'अच्छे दिन'चे आश्वासन देणारे पंतप्रधान आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत.राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून त्यांचे सारे सहकारी करीत आहेत, हे निषेधार्ह आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी सत्ताधारी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

मुळात बुलडाण्यात राठोड नावाचे जवान शहीद झाले, त्यांच्या अंत्यविधीवेळी पंतप्रधान तेथून अवघ्या 40 किलोमीटरवर होते. देशासाठी शहीद झालेल्या जवानाला, त्याच्या कुटुंबियांना भेटावे, कुटुंबियांचे सांत्वन करावे,  असे त्यांना त्यावेळी वाटले नाही, मात्र आता या जवानांच्या शौर्याचा लाभ राजकारणासाठी ते करीत फिरत आहेत. त्यांच्या नावावर मते मागत आहेत. हा प्रकार म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचाच आहे.

बेरोजगारीच्या मुद्दयावर पवार म्हणाले, 'मी परभणी, उस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नाशिकला फिरलो. सगळीकडे दुष्काळ आहे. लोक दुष्काळाची चिंता करतात. आज राज्यात बेरोजगारी, महागाई, दुष्काळ गंभीर आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अशी स्थिती असताना पूर्वीच्या सरकारने हजारो छावण्या उभ्या केल्या त्याचा अनुभव लोकांना आहे. मात्र या भाजपने बारामतीत सारे लक्ष एकवटले असून त्यांच्या सर्व नेत्यांच्या सभा बारामतीत होणार आहेत, त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, बारामतीत मुख्यमंत्री येऊन गेले. अमित शहा येणार आहेत. नितीन गडकरी, स्मृती इराणी सभा घेणार आहेत. हे ऐकायला मिळाले. मात्र बारामती मतदारसंघात येथील सर्वांनी सातत्याने एक भूमिका कायम ठेवली. त्या विचाराला सातत्याने पाठींबा दिला. या भक्कम पाठींब्यामुळे सत्ताधारी पक्षाला येथे काही यश मिळत नाही म्हणून हा देशभरातील मारा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण मी इथे काही जणांशी बोललो, तेव्हा त्यांच्या सांगण्यानुसार आमच्यावर भाजपवाल्यांनी एवढा मारा त्यांनी केला आहे, आता आम्ही नेहमीपेक्षा जास्त मारा करू अशी या लोकांचीच चर्चा आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर पवार म्हणाले, मोदी सातत्याने पाकिस्तानविरोधात मी चॅम्पियन आहे असे म्हणतात. म्हणतात. पण लोकांची भावना एका दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी संबंध असे दुहेरी ते वागतात. आताच्या पंतप्रधानांशी त्यांचे कसे संबंध आहेत, हे मला सांगता येणार नाही. मात्र त्यांच्या या संबंधांवरून मला एक वाचनात आलेली गोष्ट आठवली. दोन राष्ट्रात कटुता होती, तेव्हा सत्ता टिकवण्यासाठी आम्ही काय करतो हे सांगताना त्यापैकी एका राष्ट्रप्रमुखाने स्टेटमेंट दिले होते की, आम्हाला संधी मिळेल तेव्हा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एकदम टोकाची भूमिका घेतो आणि सत्ता हातात ठेवतो. खरेतर सध्याची स्थिती पाहता असे काही चित्र येथे चालले आहे, अशी शंका येथे येऊ शकेल अशी स्थिती आहे.

राहूल गांधी यांच्या 72 हजार रुपयांच्या न्याय योजनेबाबत काय म्हणाले पवार

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी सखोल अभ्यास केल्याशिवाय ते बोलले नसावेत. मी देखील त्यांच्याकडून हे अर्थशास्त्र समजून घेणार आहे. त्याचे वितरण कसे करणार याचा विचार मी समजून घेणार आहे, उद्या जर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली,तर त्याला पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी करतील.

दुष्काळाबाबत पवार काय बोलले

सोलापूरात काही शेतकरी भेटले, डाळींब व द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसन झाले. ही अवस्था राज्यभरात आहे. उस्मानाबाद भागात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या घरी भेट दिली, तेव्हा मुलाने सक्तीच्या वसुली व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जासंदर्भात सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे वडीलांनी ात्महत्या केल्याचे सांगितले. आज राज्यकर्त्यांचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसते.

आज राज्यकर्त्यांकडून देखील त्यांचे अपयश आजची परिस्थिती हाताळण्यात भाजप-सेनेला अपयश आले आहे. निवडणूकीच्या पूर्वी देशात अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले. भ्रष्टाचार कमी करण्याचे आश्वासन दिले. पाच वर्षे झाल्यानंतर आश्वासनाबाबत काय झाले हे लोक विचारतील, त्याला टाळण्यासाठी लोकांच्या समोरचे विषय बाजूला ठेवून राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्वस, तुमची मते काय, या देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीयत्वाची आस्था आहे, हे शिकविण्याचा विषय नाही. देशावर कसलेही संकट आले तरी पडेल ती किंमत देणारा हा भारत देश आहे. मात्र राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून होतोय, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. लोकांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्यायला हवे, दुर्दैवाने ते होत नाही.

VIDEO: शिवसैनिकांना 'त्यांनी' स्वार्थासाठी घरी बसवलं: नवनीत राणांचा घणाघात

First published: April 16, 2019, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading