गडचिरोली जिल्ह्यात 'त्या' चार गावात 45.05 टक्के मतदान

गडचिरोली जिल्ह्यात 'त्या' चार गावात 45.05 टक्के मतदान

एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) मतदान केंद्रावर वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी व वांगेतुरी या चार गावातील नागरिकांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया चालली. याकालावधीत 45.05 टक्के मतदान झाले.

  • Share this:

गडचिरोली,15 एप्रिल- एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) मतदान केंद्रावर वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी व वांगेतुरी या चार गावातील नागरिकांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया चालली. याकालावधीत 45.05 टक्के मतदान झाले. एकूण 2686 मतदारांपैकी 1210 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 1398 पुरुष मतदारांपैकी 789 तर 1288 महिला मतदारांपैकी केवळ 421 महिलांनी मतदान केले.

भूसुरुंगस्फोट घडविल्याने होवू शकले नव्हते मतदान..

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक 11 एप्रिलला पार पडली. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशी एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया गावाजवळ माओवाद्यानी भूसुरुंगस्फोट घडविला होता. परिणामी वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी व वांगेतुरी या गावांचे मतदान झाले नव्हते. गट्टा (जांभिया) येथील मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली. या क्षणापर्यंत परिसरात कुठलीही अनुचित घटना घडली नाही.

मतदान करुन येताना अपघात, तिघांचा मृत्यू

गडचिरोली येथे मतदान करुन परत येताना झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर 9 जण जखमी झाले आहेत. गडचिरोलीमधील शंकरपूरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. हे सर्व जण मतदान करुन घरी परत येताना हा अपघात झाला होता. शंकरपूरवाडी गावाजवळ ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

First Published: Apr 15, 2019 05:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading