एक्झिट पोलनंतर नागपुरात हालचालींना वेग, RSS चे मोठे नेते गडकरींच्या भेटीला

एक्झिट पोलनंतर नागपुरात हालचालींना वेग, RSS चे मोठे नेते गडकरींच्या भेटीला

आगामी काळात इतर काही समीकरणं समोर येतात का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

  • Share this:

नागपूर, 20 मे : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी हे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेले आहेत.

भाजपचे केंद्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे सुद्धा भय्याजी जोशी यांच्या सोबत नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. या नेत्यांमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात इतर काही समीकरणं समोर येतात का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एक्झिट पोलमध्ये कुणाला धक्का, कुणाला दिलासा?

विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. कुणाला किती जागा मिळतील पाहा..

सतराव्या लोकसभेचं अखेरचं मतदान संपताच मतदानोत्तर चाचण्यांचे कौल हाती यायला सुरुवात झाली आहे. विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजपचं स्वबळावर सरकार स्थापनेचं स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही, असं बहुतेक एक्झिट पोल मध्ये वर्तवलेल्या अंदाजावरून स्पष्ट झालं. दोन प्रमुख एक्झिट पोलमध्ये रालोआला 300 च्या जागा देण्यात आल्या आहेत.

ABP Nielson

भाजप 267

काँग्रेस 127

महागठबंधन 56

अन्य 84

Republic - CVoter

भाजप 287

काँग्रेस 128

अन्य 127

Republic - Jan ki Baat

भाजप 305

काँग्रेस 124

अन्य 113

News Nation

भाजप 282 - 290

काँग्रेस 118 - 126

अन्य 130 - 138

Times Now- VMR

भाजप 306

काँग्रेस 142

अन्य 94

--

सरासरी

भाजप 291

काँग्रेस 125

अन्य 124

VIDEO: पार्थ पवारांचं काय होणार? शेकाप नेते जयंत पाटील म्हणतात...

First published: May 20, 2019, 1:39 PM IST

ताज्या बातम्या