Home /News /maharashtra /

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध पुण्यात खटला, दिली ही खोटी माहिती

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध पुण्यात खटला, दिली ही खोटी माहिती

स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर कोर्टात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

    पुणे, 16 एप्रिल- भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध मंगळवारी पुण्यात फसवणूक केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला. स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर कोर्टात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात मंगळवारी खटला दाखल करण्यात आला आहे.  खटला दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी़ एस़ गायकवाड यांच्या न्यायालयात हा फौजदारी खटला दाखल केला असून त्यावर लवकर न्यायालयात आदेश देण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी ग्रॅज्युएट नाहीत! अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या स्मृती इराणी यांनी गुरुवारी (11 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना त्यांनी आपले शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. स्मृती इराणी या 'ग्रॅज्युएट' नसल्याचे समोर आले आहे. 2014 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवताना स्मृती इराणी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून 1994 मध्ये बीएपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती दिली होती. मात्र, आता त्यांनी आपण 3 वर्षांचा कोर्स पूर्ण न केल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे. यावरून काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी इराणींवर जोरदार टीका केला आहे. 'फर्जी डिग्री की चोरनी। क्यों चौकीदार अपनी डिग्री छुपा रही हैं।', असे ट्वीट दीपक सिंह यांनी केले आहे. स्मृती इराणींच्या संपत्तीत वाढ निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात स्मृती यांनी  4.71 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित केली आहे. 2014 लोकसभा  निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांची मालमत्ता 26.98 लाख रुपये इतकी होती. स्मृती इराणी या अमेठी मतदार संघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी 3 लाख मतं मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी यांनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे. VIDEO- एकनाथ खडसेंकडून विरोधकांचा समाचार

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    First published:

    Tags: MNS, Pune S13p34, Smriti irani

    पुढील बातम्या