धक्कादायक जिवंत मतदारांना दाखवले मृत, काढली अंत्ययात्रा!

धक्कादायक जिवंत मतदारांना दाखवले मृत, काढली अंत्ययात्रा!

  • Share this:

मलकापूर, 22 एप्रिल: मलकापूर येथे मतदान केंद्रावर चक्क जिवंत मतदारांना मृत दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर मतदान केंद्रावर मृत दाखविलेल्या मृतांनी चक्क मृतांची अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा मतदान केंद्रावरून उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर नेण्यात आली. अंत्ययात्रा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला असून प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. रावेर मतदार संघात असलेल्या मलकापूर विधानसभा मतदार संघात असलेल्या बुथ क्रमांक 166 वर रोहिदास नगर मधील मतदार श्रीकृष्ण संपत शेकोकार, मोहनसिंग चिंधु गणबास, दत्तनगरमधील रजनी दिनकर जोशी यांसह जवळपास पन्नास जिवंत मतदारांना चक्क मृत दाखविल्याने एकच खळबळ उडाली. एकाच केंद्रावरली 50 जण मृत असल्याचे दाखवल्याने ही बातमी संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली. याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी विंचनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाधान कारक उत्तर न दिले नाही. त्यानंतर नगराध्यक्ष अँड हरीश रावळ,गजानन ठोसर, नगरसेवक राजु पाटील,अनिल बगाडे,अनिल गांधी यांच्या नेतृत्वात किशोर गणबास,अंकुश भोंबे,सुनिल बगाडे, गोपाल कावस्कर,भावसिंग धामोणे,नितीन परसे,विजय खिराडे,गोपाळ पठ्ठे, दिलीप काकडे(डि.के), मंगल गणबास,बुथ क्रमांक166 वरुन सहाय्यक निवडणूक अधिकारी(एस.डी.ओ)कार्यालयावर डफडे वाजवून अंत्ययात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आली.

अंत्ययात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकताच उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे, शहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस ताफ्यासह दाखल झाले. नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांनी जिवंत असलेल्या व्यक्तीला निवडणूक यादीत डिलीटेट दाखविल्याने तो मतदानापासून वंचित राहत असल्याने मतदार याद्या अद्यावत करुन 'त्या' बुथवर पुन्हा घेण्याची मागणी केली. प्रेतयात्रा काढणाऱ्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

श्रीलंका स्फोटातील आत्मघाती हल्लेखोराचा VIDEO व्हायरल

First published: April 23, 2019, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading