राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर PM मोदींवर भडकले राज ठाकरे, म्हणाले...

राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर PM मोदींवर भडकले राज ठाकरे, म्हणाले...

राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही,' असं म्हणत राज यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याच मुद्द्यावरून नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. 'राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही,' असं म्हणत राज यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

'आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही,' अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांनी लिहली आहे.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

"तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला," असा टोला राहुल गांधी यांना लगावत मोदींनी दिवंगत राजीव गांधींवर टीका केली होती.

राहुल गांधींचा पलटवार

'मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी,' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्रमक टीका केली असताना राहुल यांनी मात्र प्रेम आणि मिठी याने उत्तर दिलं आहे.

VIDEO : माझा काँग्रेस प्रवेश ही फक्त अफवा, आनंदराज आंबेडकरांचा मोठा खुलासा

First published: May 5, 2019, 11:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading