लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.बीड लोकसभा मतदारसंघासाठी (beed Lok Sabha Constituency) 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. राज्यातील 48 जागांवर ..एप्रिल आणि..एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे.
11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम
18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान
नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी
लोकसभा निवडणूक 2014
महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.
महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल
एकूण जागा 48
भाजप 23
सेना 18
राष्ट्रवादी काँग्रेस 4
काँग्रेस 2
स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1