बुलडाण्यात सेना आणि राष्ट्रवादीने केला विजयाचा दावा..वंचित आघाडीचे मतदान निर्णायक ठरणार

बुलडाण्यात सेना आणि राष्ट्रवादीने केला विजयाचा दावा..वंचित आघाडीचे मतदान निर्णायक ठरणार

लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. तर बुलडाण्याच्या दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केलाय. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • Share this:

अमोल गावंडे,(प्रतिनिधी)

बुलडाणा, 22 मे- लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. तर बुलडाण्याच्या दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केलाय. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बुलडाणा लोकसभेसाठी 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यातमध्ये युतीचे शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. दोन्हीही उमेदवार आपापल्या विजयाचा दावा करताना दिसत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेत त्यात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी गेल्या दहा वर्षांत कुठलेच विकास कामे केले नाहीत, जनतेशी संपर्क ठेवला नाही, स्वतःच्या विकास कामांवर नव्हे तर फक्त मोदींच्या नावावर मत मागण्यात आल्याचा आरोप डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे. आणि याच मुद्द्यावर जनता मला निवडून देणार असल्याचा विश्वासही डॉ.शिंगणे यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत करणार प्रवेश

जिल्ह्यात आम्ही विविध विकास कामे केलीत त्याच विकास कामांच्या जोरावर परत एकदा सत्तर हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने जनता निवडून देणार असल्याचा दावा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. नरेंद्र मोदीच देशासाठी उपयुक्त पंतप्रधान असून त्यांच्याच हातात देश सुरक्षित राहील. शिवाय काँग्रेसच्या 65 वर्षांमध्ये जी कामे झाली नाहीत ती कामे या पाच वर्षांत झालीत. त्यासाठी जनता कौल हा मोदी सरकारलाच देणार आहे. तसेच आलेले एक्झिट पोल हे शंभर टक्के खरे ठरणार आहेत, असे मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने राज्यात 23 जागा लढवल्या आहेत त्यापैकी 20 ते 22 जागा आम्ही जिंकणार असल्याचा विश्वासही प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

सरकारवर निशाणा साधत राणेंचं 'मिशन विधानसभा', मोर्चेबांधणी सुरू

दोन्ही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीची भूमिका यामध्ये महत्त्वपूर्ण राहणार असून हाच उमेदवार दोन्ही दिग्गज उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहे. दोन्ही उमेदवार आपला विजयाचा दावा करत आहेत. मात्र, जनतेने आपले अमुल्य मत कुणाच्या पदरात टाकले, हे आता 23 मे रोजी समजणार आहे.

SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?

First published: May 22, 2019, 11:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading