अमिताभ बच्चनचे सिनेमेही फ्लॉप होतात, पराभवाने खचणार नाही - सुप्रिया सुळे

अमिताभ बच्चनचे सिनेमेही फ्लॉप होतात, पराभवाने खचणार नाही - सुप्रिया सुळे

'एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही. लोकांचा पुन्हा विश्वास संपादन करू.'

  • Share this:

वैभव सोनवणे,पुणे 27 मे : नाही नाही म्हणता म्हणता राष्ट्रवादीच्या खासदार यांनी राष्ट्रवादीच्या राज्यातल्या पराभवाबद्दल भाष्य केलं. या आधी माध्यमांशी बोलण्याची इच्छा नाही असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र त्यांनी मोजक्या शब्दात आपला निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही. अमिताभ बच्चन यांचेही सिनेमे फ्लॉप होतात त्यामुळे खचून जावू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, पार्थ सहित सगळ्याच पराभूत उमेदवारांना सल्ला आहे की त्यांनी खचून जाऊ नये.आता आणखी जोरात काम करण्यासाठी तयारी केली पाहिजे.

बारामतीत मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांचा आहे असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींना मिळालेला विजय हा लोकांचा निर्णय आहे. तो मान्य केला पाहिजे. आता त्यांनी उत्तम काम करावं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मला खडकवासल्यातून इतकं विरोधी का मतदान का झालं याचा आढावा त्यानी आजच्या बैठकीत घेतला. आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन करू असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री फडणवीस बिझी; शरद पवारांना CMOने अद्याप दिली नाही वेळ!

निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर सर्व राजकीय नेते दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. राज्य मंत्रिमंडळाने देखील यासंदर्भात मंत्री आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले होते. या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्यासंदर्भात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही.

First published: May 27, 2019, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading