रामटेक गडावर पुन्हा फडकला भगवा, शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा विजय

रामटेक गडावर पुन्हा फडकला भगवा, शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा विजय

रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

  • Share this:

रामटेक, 23 मे : विदर्भातली रामटेकच्या गडावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांचा पराभव केला आहे. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.  या मतदारसंघाची जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. रामटेकचा राजकीय इतिहास पाहिला तर हा शिवसेनेचा गड मानला जातो. यापूर्वी येथे काँग्रेसचं वर्चस्व होतं.

विदर्भातील विजयी उमेदवार 

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

2014च्या निवडणुकीत शिवसेनेचं कमबॅक 

1999पासून शिवसेनेनं सलग विजय मिळवला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे रामटेक ही शिवसेनेची जागा आहे, असं म्हणत होते. पण 2009 मध्ये इथे पुन्हा काँग्रेस पक्ष निवडून आला. काँग्रेसचे मुकुल वासनिक इथून खासदार झाले आणि केंद्रात मंत्री बनले.

वाचा : 

काँग्रेसने लावला जोर

या निवडणुकीत ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. इथे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी जोर लावला होता. विदर्भात रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे 51. 72 टक्के मतदानाची नोंद झाली.

वाचा : VIDEO : आमच्यासाठी राज्यघटना सर्वोच्च, विजयानंतर मोदींचं UNCUT भाषण

नरसिंहराव यांचा मतदारसंघ

रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी निवडणूक लढवली आणि  ते जिंकूनही आले. 1984 आणि 1989 मध्ये नरसिंह राव इथूनच संसदेत पोहोचले आणि पंतप्रधान झाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी या जागेवर ताबा मिळवला. कृपाल तुमाने यांना 5 लाख 19 हजार 892 मतं मिळाली. तर मुकुल वासनिक यांना 3 लाख 44 हजार 101 मतं मिळाली. बसपा इथे तिसऱ्या स्थानावर होती.

लोकसभा निवडणूक 2014चा निकाल 

वाचा : औरंगाबादेत इम्तियाज जलील विजयी, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना मारक ठरला 'जावई' फॅक्टर

कृपाल बालाजी तुमाने शिवसेना : 5,19,892 मतं

मुकुल वासनिक, काँग्रेस, 3,44,10 मतं

कृपाल तुमाने यांचा 4,85,482 मतांनी विजय

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

First published: May 23, 2019, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading