उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त पराभूत; भगव्याची लाट कायम

उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त पराभूत; भगव्याची लाट कायम

उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त पूनम महाजन यांना आव्हान उभं करणार अशी चर्चा जोरात रंगली होती. पण, साऱ्या गोष्टींचा अंदाज फोल ठरला असून पूनम महाजन यांनी बाजी मारली आहे. पूनम महाजन यांनी 1 लाख 2 हजार 69 मतांनी प्रिया दत्त यांचा सलग दुसऱ्या वेळी पराभव केला आहे.2014ची तुलना करता महाजन यांच्या मतांमध्ये घट झाल्याचं दिसून येत आहे. 2014मध्ये पूनम महाजन यांना 1 लाख 87 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच शिवसेनेच्या उमेदवारांना मोदी लाटेचा फायदा मिळाला होता. पण, यावेळी मात्र युतीला आघाडी जोरदार टक्कर देणार, अशी चर्चा होती. पण, हे सारे अंदाज फोल ठरले. मतदान मोजणीला सुरूवात झाल्यापासूनच पूनम महाजन यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम होती.

संमिश्र मतदारसंघ

उच्चभ्रू आणि गरीब असे दोन्ही मतदार असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात युतीच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची लढत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी होती. पूनम महाजन या भाजयुमोच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचं संघटनात्मक पाठबळ आहे. त्यांनी आतापर्यंत केलेलं काम पुस्तिका काढून मतदारांपर्यंत पोहोचवलं होतं. तरीही नोटबंदी, जीएसटी यासारखे भाजप सरकारच्या विरोधात जाणारे मुद्दे हे त्यांच्यासमोरही आव्हान होते.

लाव रे ते फाटके; उद्धव ठाकरेंचा राजना पहिल्यांदाच जोरदार टोला

प्रिया दत्त उशिरा रिंगणात

दुसरीकडे प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय उशिरा घेतला. काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसू शकतो, अशी चर्चा होती. कुर्ला, बांद्रा, विलेपार्ले अशा भागात मतदारांशी या दोन्ही उमेदवारांनी किती संपर्क साधला यावर त्यांचं भवितव्य अवलंबून होतं. मुंबईमधली ही लढत दोन महिला उमेदवारांमधली असल्याने या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण, त्यामध्ये पूनम महाजन यांची सरशी झाली.

या लोकसभा मतदारसंघात वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना, चांदिवली,वांद्रे पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. 2014मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.

उत्तर पश्चिम मुंबईत भगवा फडकला; शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता.  राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. पण, त्याचा काहीही फायदा हा विरोधकांना झालेला दिसला नाही.

VIDEO : राहुल गांधींनी घेतली पत्रकार परिषद, कार्यकर्त्यांना दिला 'हा' संदेश

First published: May 23, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading