गुरूचंच राज्य! नागपूरचे नितीन 'गड'करी, भाजपचा दमदार विजय

गुरूचंच राज्य! नागपूरचे नितीन 'गड'करी, भाजपचा दमदार विजय

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी नागपूर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे.

  • Share this:

नागपूर, 23 मे : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी नागपूर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह गडकरींनी आपला गड कायम राखला आहे. गडकरींनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा पराभव केला आहे. येथे गुरू (नितीन गडकरी) विरूद्ध शिष्य (नाना पटोले) अशी रंगतदार लढत होती. नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले यांच्या लढतीमुळे नागपूरची ही लढत खूपच गाजली. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसने नाना पटोलेंना उमेदवारी देऊन भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. लोकसभा निवडणूक 2014मध्ये नाना पटोल यांनी भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि जिंकलीदेखील होती. पण एनडीए सरकारच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींवर जाहीर टीका व्यक्त करत पटोलेंनी भाजपची साथ सोडली होती.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची आकडेवारी

नितीन गडकरी, भाजप : 557026 मतं 54.83 टक्केवारी

नाना पटोले, काँग्रेस : 3,89,761 मतं 38.36 टक्केवारी

नितीन गडकरींच्या विजयाची कारणे :

मोदी सरकारमधील प्रभावी मंत्री

एकट्या नागपुरात 60 हजार कोटी रुपयांची विकासकामं आणल्याचा दावा

नाना पटोलेंचा नागपुरातला कमी संपर्क

कार्यकर्त्यांचा पाठिंबा

नाना पटोलेंच्या पराभवाची कारणे :

जातीचं समीकरण बांधण्याचा प्रयत्न

दलित, मुस्लीम, कुणबी, कोष्टी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न

नागपुरात कमी संपर्क

राहुल गांधी यांच्या सभेशिवाय कोणत्याही नेत्याची मदत नाही

वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: भारत पुन्हा जिंकला, ऐतिहासिक विजयानंतर मोदींची पहिला प्रतिक्रिया

नागपूर मेट्रोचा मुद्दा

नाना पटोले हे नागपूरच्या मतदारांसाठी बाहेरचे उमेदवार असले तरी नितीन गडकरींना त्यांनी चांगलीच लढत दिली. नागपूरमध्ये 22 लाख मतदार होते. यामध्ये दलित, मुस्लीम, कुणबी समुदायाची संख्या 12 लाख एवढी होती. नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय मंत्रालयाचा कारभार असल्यामुळे त्यांनी नागपूरमध्ये केलेली विकासकामं, नागपूर मेट्रोचा प्रकल्प हे निवडणुकीतले मुद्दे बनवले होते.

वाचा : LIVE Lok Sabha Election Result 2019: अशोक चव्हाण पडले, राज्यात काँग्रेसचे वस्त्रहरण

स्वतंत्र विदर्भ आंदोलन

नाना पटोले हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. पटोले हे स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे समर्थक मानले जातात. नाना पटोले हे लोकसभेच्या रिंगणात असूनही या निवडणुकीत नितीन गडकरी हेच केंद्रस्थानी राहिले.

आधी काँग्रेसचं वर्चस्व

नागपूर हे संघाचं मुख्यालय असूनही पूर्वी येथे काँग्रेसचंच वर्चस्व होतं. लोकसभा निवडणूक 2014मध्ये मात्र नितीन गडकरींनी काँग्रेसचा बालेकिल्ला भेदत विलास मुत्तेमवार यांचा दणदणीत पराभव केला. यापूर्वी येथे विलास मुत्तेमवार चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. नितीन गडकरींचा विजय हा काँग्रेसला मोठा धक्का होता.

हाय प्रोफाइल मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस निवडून आले. त्यामुळेच नागपूर लोकसभा मतदारसंघ आणि सगळ्या विधानसभा मतदारसंघांत भाजपचं वर्चस्व आहे.

लोकसभा निवडणूक 2014चा निकाल

नितीन गडकरी, भाजप : 5,87,767

विलास मुत्तेमवार, काँग्रेस : 3,02,939 मतं

नितीन गडकरी यांचा 284,828 मतांनी विजय झाला होता.

VIDEO : लोकसभेत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019मध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपच्या युतीनं दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीचे निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले.

First published: May 23, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading