लोकसभा निवडणूक 2019 निकाल LIVE : मावळमध्ये या कारणांमुळे हरले पार्थ पवार

लोकसभा निवडणूक 2019 निकाल LIVE : मावळमध्ये या कारणांमुळे हरले पार्थ पवार

मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवारांचा नातू पार्थ पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्यावर मात केली. पार्थ पवार यांच्या पराभवाला अनेक मुद्दे कारणीभूत आहेत.

  • Share this:

मावळ, 23 मे : मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवारांचा नातू पार्थ पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्यावर मात केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या पराभवाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पार्थ पवारच्या पराभवाला अनेक मुद्दे कारणीभूत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पार्थ पवार यांचं नाव जाहीर झालं तेव्हाच त्यांच्या विजयाबद्दल शंका व्यक्त केली जात होती आणि झालंही तसंच.

राजकारणाचा शून्य अनुभव

कोणताही अनुभव नसताना पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणं राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याचं ठरलं. पार्थ यांच्या भाषणांवरूनही त्यांचा कमी अनुभव दिसून येत होता.मतदारसंघाची पुरेशी माहिती नाही, भाषणशैलीचा अभाव या गोष्टींमुळे ते पहिल्याच भाषणात ट्रोल झाले. त्यांच्याकडे नेतृत्वगुणांचीही कमतरता दिसली.

आयात उमेदवार

मावळ हा मतदारसंघ पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी नवा होता. इथे शेकापने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी केवळ अजित पवार आणि शरद पवार यांच्या नावावर पार्थ यांना ही निवडणूक जिंकता आली नाही.त्याचबरोबर मावळसाठी काय करणार याबद्दल कोणतंही ठोस आश्वासन त्यांनी दिलं नाही. मावळमध्ये झालेलं कमी मतदान हे देखील पार्थ पवार यांच्या पराभवासाठी कारण ठरलं.

श्रीरंग बारणेंना अनुभवाचा फायदा

याउलट शिवसेनेचे इथले विद्यामान खासदार श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांच्या तुलनेत अनुभवी होते. त्यांना 5 वेळा संसद रत्न पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नव्हता. स्वच्छ कारभारामुळे मतदारांनी त्यांना पसंती दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातल्या 5 विधानसभा मतदारसंघात भाजप - शिवसेनेचं वर्चस्व असल्याचाही त्यांना फायदा झाला. पार्थ पवार यांना इथे तरुणांची मतं मिळतील, असं म्हटलं जात होतं. पण तरुण चेहरा म्हणून पक्षाने त्यांच्यावर टाकलेली मदार सार्थ ठरली नाही.

गड आला पण सिंह गेला

पार्थ पवार यांचा पराभव झाला असला तरी बारामतीमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. त्यामुळेच राष्ट्रवादीची अवस्था 'गड आला पण सिंह गेला', अशी झाली आहे.

==========================================================================

VIDEO : पार्थच्या पराभवामुळे आजोबा दुखावले, अजितदादांचा उल्लेखही टाळला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 05:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading