हातकणंगले निकाल 2019 LIVE : राजू शेट्टींना धक्का, मानेंची आघाडी

हातकणंगले निकाल 2019 LIVE : राजू शेट्टींना धक्का, मानेंची आघाडी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गेली 10 वर्षं राजू शेट्टी जिंकत आले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी युती केली होती.

  • Share this:

हातकणंगले, 23 मे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गेली 10 वर्षं शेतकरी नेते राजू शेट्टी जिंकत आले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी भाजपशी युती केली. NDA चे घटक पक्ष या नात्याने त्यांनी हातकणंगलेची निवडणूक लढवली पण यावेळी मात्र ते UPA सोबत आहेत.

ताजा कल हाती आला तेव्हा राजू शेट्टी पिछाडीवर पडले आहेत. इथून शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे.

राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेने धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. इथे बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत.

मागच्या 2 निवडणुकांमध्ये विजय

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अजेंडा घेऊन लढणाऱ्या राजू शेट्टींनी 2009 आणि 2014 च्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे आता राजू शेट्टी पुन्हा विजयी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना 6 लाख 40 हजार 428 मतं मिळाली होती. त्याचवेळी काँग्रेसचे कलप्पा आवाडे यांना 4 लाख 62 हजार 618 मतं मिळाली.

2009 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना मोठा विजय मिळाला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता मानेंचा पराभव केला होता.

राजकीय इतिहास

हातकणंगलेच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1999 पर्यंत हा दबदबा कायम राहिला. पण त्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाकडे गेली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात शाहूवाडी, हातकणंगले आणि शिरोळ या जागा शिवसेनेकडे आहेत. इचलकरंजी आणि शिराळ्यामध्ये भाजपचे आमदार आहेत तर इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

शेतकरी संघटनेत काम

राजू शेट्टी या भागातले लोकप्रिय नेते आहेत.याआधी त्यांनी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेमध्ये काम केलं. नंतर पहिल्यांदा त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. 2004 मध्ये ते विधानसभेत गेले. त्यानंतर 2009 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हा स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला. त्यांच्या या पक्षाचा दबदबा याही निवडणुकीत पाहायला मिळणार का, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading