नवनीत राणांच्या 'आँधी'मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ भुईसपाट

नवनीत राणांच्या 'आँधी'मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ भुईसपाट

अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झाला आहे.

  • Share this:

अमरावती, 23  मे : अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झाला आहे. राणा यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ गेली 25 वर्षं शिवसेनेच्याच ताब्यात होता. त्यामुळे हा निकाल  शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 2014च्या निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांचा पराभव केला होता. मात्र पाच वर्षांनंतर राणांनी हा डाव उलटवत आपल्या 'आँधी'मध्ये अडसूळ यांना भुईसपाट केल आहे.

अमरावती लोकसभा निवडणूक निकाल

नवनीत राणा, आघाडीच्या उमेदवार : 5,05,133 मतं 45.91 टक्केवारी

आनंदराव अडसूळ, शिवसेना : 4,68, 687 मतं  42.6 टक्केवारी

नवनीत राणा यांच्या विजयाची कारणं

इंग्लिश सह 7 भाषांवर प्रभुत्व

मतदारांच्या सतत संपर्कात

सिनेअभिनेत्रीचा आव न आणता सहजतेनं सामान्य लोकांमध्ये मिसळणे

जिल्ह्यातील अडीच लाख महिलां प्रत्यक्षात जाऊन भेटल्या

आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणं

10 वर्षांपूर्वी जिल्ह्यात मंजूर झालेले एअरपोर्ट, रेल्वे वॅगन प्रकल्प, भारत डायनॅमिक प्रकल्प अजूनपर्यंत सुरू करण्यात अपयश

मतदार संघातील जनतेपर्यंत सतत संपर्क ठेवण्यात अपयश

जास्त काळ दिल्ली मुंबईत घालवत असल्यानं मतदारांची नाराजी

जिल्ह्यातील शिवसेना कमकुवत केल्याचा आरोप

वाचा :BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: राहुल गांधी अमेठीतून पराभूत

दरम्यान, अमरावतीमध्ये जेव्हा-जेव्हा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, त्या-त्यावेळी महिला उमेदवाराचाच विजय झाला, असा इथला रंजक इतिहास आहे. काँग्रेसच्या उषा चौधरी 1980 साली इथून लढल्या आणि जिंकल्या. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही 1991 मध्ये इथेच विजय मिळवला होता. आता लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आघाडीच्या उमेदवार नवनीत राणादेखील जिंकल्या आहेत.

वाचा :

लोकसभा निवडणूक 2014चा निकाल

आनंदराव अडसूळ शिवसेना 4,67,212 मतं

नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस 3,29,280 मतं

आनंदराव अडसूळ यांचा 1,37,932 मतांनी विजयी

वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल

लोकसभा निवडणूक 2014मध्ये येथे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत विजय झाला होता. अडसूळ यांना 4 लाख 67 हजार 212 मतं तर राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांना 3 लाख 29 हजार 280 मतं मिळाली होती. 2019मध्ये हेच उमेदवार पुन्हा आमनेसामने आले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, तिवसा, बडनेरा, मेळघाट, अचलपूर आणि दर्यापूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये अमरावती दर्यापूर, मेळघाट भाजपकडे आहे तर तिवसा काँग्रेसकडे आहे. बडनेरा आणि अचलपूरमध्ये अपक्ष आमदार आहेत.

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत

First published: May 23, 2019, 1:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading