Analysis : अकोल्यात या कारणांमुळे चालला नाही 'वंचित फॅक्टर'

Analysis : अकोल्यात या कारणांमुळे चालला नाही 'वंचित फॅक्टर'

2014 च्या मोदी फॅक्टरने जाती-पातीची गणितं आणि व्होट बँकेचं राजकारण पार बदलवून टाकलं. त्याचा जोरदार फटका सर्वच पक्षांना बसलाय.

  • Share this:

अकोला 23 मे :लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनी मिळून स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीची चांगलीच चर्चा झाली. या आघाडीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला मात्र प्रकाश आंबेडकर ते लढवत असलेल्या दोनही जागांवर विजय होऊ शकले नाही.

अकोला लोकसभा 2019 च्या निवडनिकीत भाजपचे संजय धोत्रेंनी मोडला स्वत:चाच विक्रम मोडलाय. धोत्रे 5 लाख 33 हजार 397 मतांसह 263,721 मतांनी आघाडीवर आहेत. 2014 मध्ये संजय धोत्रे यांना 4 लाख 56 हजार 472 मत मिळाली होती, तर 2 लाख 3 हजार 116 मतांनी संजय धोत्रे निवडून आले होते.

अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला समजला जातो. या जागेवर ते 1999 मध्ये निवडूनही आले होते. मात्र नंतर परिस्थिती बदलत गेलीय. 2014 च्या मोदी फॅक्टरने जाती-पातीची गणितं आणि व्होट बँकेचं राजकारण पार बदलवून टाकलं. त्याचा जोरदार फटका प्रकाश आंबेडकरांना बसलाय.

त्याचबरोबर त्यांनी सोलापूरातूनही निवडणूक लढविल्याने ते पूर्णवेळ अकोल्यावर लक्ष ठेवू शकले नाहीत.

एक अपवाद वगळता गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे. अकोला लोकसभा मतदार संघात अकोला जिल्ह्यातल्या 5 आणि वाशिम जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. एकून 6 विधासभा मतदार संघ अकोला लोकसभा मतदारसंघात येतात.

1999 मध्ये प्रकाश आंबेडकर आणि मखराम पवार यांनी भारिपचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मिळवलेला विजय चांगलाच गाजला होता. त्याचा अकोला पॅटर्न म्हणूनही उल्लेख केला गेला. मात्र नंतर तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. मात्र अजुनही त्या निवडणुकीच उल्लेख केला जातो.

2014 मध्ये मिळालेली मते

संजय धोत्रे, भाजप – 456472

हिदायत पटेल, काँग्रेस -  253356

प्रकाश आंबेडकर, भारिप - 238776

या आधीचे निकाल

2014-2019 – संजय धोत्रे, भाजप

2009-2014 - संजय धोत्रे, भाजप

2004-209 - संजय धोत्रे, भाजप

1999-2004 – प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघ

First published: May 23, 2019, 5:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading