आईच्या पराभवाचा बदला घेत शेट्टींना दाखवलं आस्मान, हे मुद्दे ठरले परिणामकारक

आईच्या पराभवाचा बदला घेत शेट्टींना दाखवलं आस्मान, हे मुद्दे ठरले परिणामकारक

सलग दोन वेळा लोकसभा जिंकलेल्या खासदार राजू शेट्टींचा पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या धैर्यशील मानेंनी जोरदार लढत देत धक्कादायक निकाल नोंदवला.

  • Share this:

कोल्हापूर, 23 मे : हातकणंगले मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार झालेल्या स्वाभिमानी शेतकऱी संघटनेचे राजू पिछाडीवर आहेत. जवळपास एक लाख मतांनी पिछाडीवर असलेल्या राजू शेट्टी यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. त्यांच्यासमोर पहिल्यांदाच लोकसभा लढवत असलेल्या शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचे आव्हान होते.

राजू शेट्टी गेल्या निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढले होते. तर यंदा युपीएचा घटक पक्ष म्हणून मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या धैर्यशिल माने यांचे आव्हान होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी जवळपास एक लाख मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

मतदारसंघात जनसंपर्क कमी झाल्याचा फटका

राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्य़ आणि देश पातळीवर आंदोलन करताना त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला याचाच फटका त्यांना बसला. याशिवाय जैन विरुद्ध मराठा असा संघर्षही परिणाम करणारा ठरला. सलग 2 वेळा खासदार झालेल्या राजू शेट्टी यांच्याबद्दल जनतेत विरोध दिसत होता. दरम्यान ऐन निवडणुकीच्या आधी त्यांच्याकडून झालेलं ब्राह्मण समाजाबद्दलचं वक्तव्य भोवलं. तसेच सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली याचाही निकालावर परिणाम झाला.

धैर्यशील मानेंना नवमतदारांचा पाठिंबा

शेट्टींच्या विरोधात महायुतीनं शिवसेनेच्या नवख्या धैर्यशिल मानेंना उभा केलं होतं. नवमतदारांवर प्रभाव टाकण्यात धैर्यशिल माने यशस्वी झाले. नव्या दमाच्या मतदारांनी तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवला. धैर्यशील मानेंना इचलकरंजी, जयसिंगपूरमधील उद्योजकांचा पाठिंबा मिळाला. धैर्यशील मानेंच्या विजयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघात लक्ष घातलं होतं. याशिवाय शेट्टींना थेट विरोध न करता विनय कोरे यांचा पाठिंबाही महत्त्वाचा ठरला.

आईच्या पराभवाचा 10 वर्षांनी घेतला बदला

मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी इचलकरंजी मतदारसंघातून धैर्यशील माने यांची आई माजी खासदार निवेदिता माने या 1999 आणि 2004 मध्ये लोकसभा जिंकल्या होत्या. 2009 मध्ये हातकणंगलेतून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, यावेळी राजू शेट्टींनी त्यांचां विजयी वारू रोखला.

राजू शेट्टींनी 2014 मध्येही विजय मिळवला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कल्लापा आवाडेंचा पराभव केला होता. यंदा निवेदिता मानेंच्या पुत्रानेच खासदार राजू शेट्टींची विजयी घौडदौड रोखली. शेट्टींच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच पराभव ठरणार आहे.

VIDEO : पार्थच्या पराभवामुळे आजोबा दुखावले, अजितदादांचा उल्लेखही टाळला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading