पुणे, 10 एप्रिल- वंचित आघाडी ही किंचित आघाडी असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बहुजन भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला आतून मदत करण्यापेक्षा डायरेक्ट मदत करावी, म्हणजे ते निवडून येतील. त्याचप्रमाणे आंबेडकरांना मंत्रिपदही मिळेल, असेही आठवले यांनी सांगितले.
रामदास आठवले पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळीही पंतप्रधान मोदींच्या विकासाची हवा आहे. यात बारामतीचा शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळणारच, असा दावा देखील आठवले यांनी व्यक्त केला. राहुल गांधींनी राफेल प्रकरणात देशातील गाफील ठेवू नये, मोदी हे फकीर आहेत, राहुल गांधी फकीर होऊ शकत नाहीत, अशा शब्दात आठवले यांनी टोला लगावला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती असावी, असे भारत-पाकमधील ताणल्या गेलेल्या संबंधावर बोलताना आठवले यांनी सांगितले.
एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत