राधाकृष्ण विखे पाटलांवर काय होणार कारवाई? राहुल गांधी, बाळासाहेब थोरातांमध्ये चर्चा

राधाकृष्ण विखे पाटलांवर काय होणार कारवाई? राहुल गांधी, बाळासाहेब थोरातांमध्ये चर्चा

राधाकृष्ण विखे - पाटील यांच्यावर राहुल गांधी काय कारवाई करणार याकडे आता सर्वाचं लक्षलागून राहिलं आहे.

  • Share this:

संगमनेर, 27 एप्रिल : मागील काही दिवसांपासून राधाकृष्ण विखे  पाटील यांनी पक्षाविरोधात जणू बंडाची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर संगमनेर इथं राहुल गांधींची सभा सुरू असताना राधाकृष्ण विखे  पाटील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे राधाकृष्ण विखे  पाटील यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत चर्चा सुरू आहेत. संगमनेर इथं सभा झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बाबासाहेब थोरातांच्या घरी मुक्काम केला. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच चर्चेदरम्यान राहुल गांधी आणि बाबासाहेब थोरात यांच्यामध्ये विखे  पाटील यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेवर देखील चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे राहुल गांधी आता राधाकृष्ण विखे  पाटलांवर कारवाई करणार का? हे पाहावं लागणार आहे. शिवाय, राधाकृष्ण विखे  पाटील हे आघाडीच्या प्रचारामध्ये देखील कुठेच दिसले नाहीत.

8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी

विखेंनी केलं मोदींचं कौतुक

विखे शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार यावर मोठ्या राजकीय चर्चांणा उधान आलं आहे. दरम्यान, पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे पाटील हे आज त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ साकुरी गावात विखे पाटलांनी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्याचबरोबर पवार आणि बाळासाहेब थोरातांवर निशाना साधला. तर सगळ्यात विशेष म्हणजे या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. 'मोदींचा जे जमतं ते पवार आणि थोरातांना का समजत नाही' असा सवालही यावेळी विखे पाटलांनी विचारला. 'आमच्या सांगण्यावरून नगरच्या सभेत मोदींनी स्वतंत्र पाणी मंत्रालयाची घोषणा केली. पण पवार आणि थोरातांकडून फक्त भावनिक आणि व्यक्तिगत राजकारण करण्यात आलं.' असं म्हणत विखे पाटलांनी पवारांवर आणि थोरातांवर टीका केली.

नापिकी, कर्जबाजारीपणामुळे 2 दिवसांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राधाकृष्ण विखेंनी 'हात' सोडला, आता कोणता झेंडा 'हाती'?'

मुलाला पक्षाने जागा मिळवून दिली नाही म्हणून पक्षावर नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे विखे आज काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

First published: April 27, 2019, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading