'लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा एकत्र होणार'

'लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा एकत्र होणार'

आगामी लोकसभा निवडणुकीसोबत राज्यातील विधानसभा निवडणूक देखील होणार असल्याचे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 08 फेब्रुवारी: आगामी लोकसभा निवडणुकीसोबत राज्यातील विधानसभा निवडणूक देखील होणार असल्याचे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. औरंगाबाद येथील सभेत चव्हाण यांनी हे विधान केले. येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील, असे चव्हाण यांनी सांगितले.

लोकसभेसोबत 13 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, विधी आयोगाची शिफारस

चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. चव्हाण यांच्या या वक्तव्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बैठका सुरु आहेत. दोन्ही पक्षांनी उमेदवारांची यादी देखील तयार केली आहे. केवळ बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येणार ही नाही याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे आघाडीतील दोन्ही पक्षांनी लोकसभे सोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्याचे दिसून येते.

...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान

एकत्र निवडणुका घेतल्यास भाजपला फायदा

काही दिवसांपूर्वी भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार लोकसभेसोबत जर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घेतल्यास त्याच भाजपचा फायदा होईल असे म्हटले होते. त्यामुळे भाजप लोकसभे सोबतच राज्यात देखील निवडणुका घेऊ शकते.

एकत्र निवडणुकींची पंतप्रधान मोदींची आयडिया

तीन वर्षांपूर्वी 2016मध्ये 'नेटवर्क 18' ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्याची आयडिया बोलून दाखवली होती. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या निवडणुकांमधून देशाला बाहेर काढा, अशी विनंती अनेक राजकीय पक्षांनी माझ्याकडे बोलून दाखवली होती. त्यामुळे एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घ्यावी असा विचार आला. 10 दिवसांत निवडणूक झाल्यातर पुढील पाच वर्ष कारभार सुरळीत चालेल. पण, हे एका पक्षाचे काम नाही. याला सर्व पक्षांचा पाठिंबा असायला हवाय. निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र आले तर हे शक्य होऊ शकतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या या आयडियाला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाठिंबा दर्शवला होता. आचारसंहितेमध्ये आता बदल झाला पाहिजे. एकत्र निवडणूक पद्धतीचा सर्व पक्षांनी विचार करायला हवा, असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं.

या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूका प्रस्तावित आहेत.

-आंध्र प्रदेश, ओडीसा, अरूणाचल, सिक्कीम,

- राज्यांच्या विधानसभांचा कालावधी कमी करावा लागेल

- महाराष्ट्र - मुदत संपणार नोव्हेंबर 2019, पाच महिने कमी कारावा लागेल.

- हरियाणा- मुदत संपणार नोव्हेंबर 2019, पाच महिने कमी कारावा लागेल.

- झारखंड - मुदत संपणार जानेवारी 2020, सात महिने कमी कारावा लागेल

- दिल्ली - मुदत संपणार फेब्रुवारी 2020, 8 महिने कमी करावा लागेल.

- फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभा विसर्जीत करण्याची तयारी

- लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची सत्ताधारी पक्षांची तयारी

- लोकसभा निवडणुकी सोबतच विधानसभा निवडणुक एकत्र घेऊन सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याची सत्ताधारी भाजप-शिवसेनेची तयारी

- युतीचं जागावाटप शेवटच्या आठवड्यात अंतिम होणार असल्याची सूत्रांची माहीती

- शिवसेनेनं गेला महिनाभर विधानसभा निहाय आढावा बैठका सुरू केल्यात. त्यात प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आलीय

- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानावर, सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार सत्ताधारी नेत्यांनीही शक्यता नाकारलेली नाही

- सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याचीच शक्याता बळावलीय

First published: February 8, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading