...म्हणून पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियावर 'नथुराम गोडसे' ट्रेंडिंग

...म्हणून पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियावर 'नथुराम गोडसे'  ट्रेंडिंग

हिंदू दहशतवाद या शब्दावरून पुन्हा एकदा ट्विटर वॉर रंगलं आहे. नथुराम गोडसे हा टॅग ट्विटर ट्रेंड्सवर टॉपला पोहोचला त्यामागे हे आहे कारण....

  • Share this:

मुंबई, 02 एप्रिल : सोमवारी वर्ध्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हिंदू दहशतवाद' मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं. आपल्या भाषणात त्यांनी हिंदू धर्म जुना आहे. शांतीप्रिय आहे. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हिंदू धर्मांनं कधीही हिंसा केली नाही. पण, काँग्रसनं मात्र हिंदूंना बदनाम केलं अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. मोदींच्या या उल्लेखावरून आता पत्रकार आणि कार्यकर्ते आशुतोष यांनी ट्वीट करून '...तर नथुराम गोडसे कोण होता?' असा सवाल केला. त्यामुळे आता यावरून ट्वीटर वॉर रंगल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

वर्धा, हिंदू धर्म आणि महात्मा गांधी

वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदींचं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा झाली. या वेळी केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू धर्म शांतीप्रिय असल्याचं म्हटलं आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही मोदींनी शरसंधान साधलं. मोदींच्या भाषणानंतर आशुतोष यांनी ट्वीट करून ...मग नथुराम गोडसे कोण? असा सवाल केला. विशेष बाब म्हणजे वर्ध्यापासून जवळच महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आता यावर देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान,आशुतोष यांच्या या ट्वीटला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाली आहेत. हजारोंनी ते रिट्वीट केलं गेलं आहे. शिवाय, काहींनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळेच नथुराम गोडसे हा टॅग ट्विटरवर टॉप ट्रेंड्समध्ये येऊन पोहोचला.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

"हिंदू धर्म हा शांतताप्रिय आहे. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हिंदू धर्मांनं केव्हाही हिंसा केली नाही किंवा हिंसेचं समर्थन देखील केलं नाही. मतांसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही थराला जातील. हिंदूंना बदनाम करण्याचं पाप हे काँग्रेसनं केलं आहे. काँग्रेसमुळे हिंदू बदनाम झाले. हिंदू दहशतवाद हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना केला. हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? हे पाप कुणी केलं? काँग्रेसच्या साऱ्या बाबी आता समोर येत आहेत. पण, काँग्रेसला आता पापापासून मुक्ती नाही. देशानं काँग्रेसला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे",  असं मोदी म्हणाले.

VIDEO: 'तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता?' राहुल गांधी पत्रकारांवर भडकले

First published: April 2, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading