युतीत मतभेद झाले पण भगव्याशी गद्दारी केली नाही - उद्धव ठाकरे

युतीत मतभेद झाले पण भगव्याशी गद्दारी केली नाही - उद्धव ठाकरे

शिर्डीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.

  • Share this:

शिर्डी, 23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत महायुतीला शह देण्याासाठी 56 पक्ष एकत्र आले आहेत. या निवडणुकीत आम्ही भगव्यासाठी युती केली आहे. आमच्या युतीवर टीका करणाऱ्यांनी ती खुशाल करावी. मात्र, भगवा खाली घेण्यासाठी तुमच्या 56 पिढ्या जरी एकत्र आल्या तरी भगवा उतरवू शकत नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेर इथं झालेल्या सभेत केली.

गेल्या पाच वर्षांच भाजप-शिवसेनेत मतभेद झाले मात्र, आम्ही भगव्याशी कधीच गद्दारी केली नाही. महायुतीला शह देण्यासाठी 56 पक्ष जरी एकत्र आले असले तरी विजय आमचाच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे,मुंडे,महाजन यांनी आपलं आयुष्य भगव्यासाठी वेचलंय मात्र आता देश स्वातंत्र करण्यासाठी लढणारी काँग्रेस राहीलेली नाही. राहुल गांधी हे देशद्रोह करणारे कलम रद्द करण्याची भाषा करतात. आमच्याकडे जे अणुबॉम्ब आहेत, ते आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत तर ते पाकिस्तानसाठीच ठेवले आहेत. देशद्रोह कोणी केला तर त्यास आम्ही फासावर चढविणारे आहोत. आपला देश भागव्याच्या दिशेने न्यायचा का देशद्रोहाचे कलम रद्द करणार्‍या राहुल गांधींच्या मागे न्यायचा हे तुम्ही ठरवा असंही ते म्हणाले.

आम्ही शरद पवारांसारखे पळपुटे नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीकास्त्र सोडले. सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणारे कोण आहेत असा सवाल करत ज्यांना आपल्या देशाच्या सैनिकांवर विश्वास नाही ते पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहताहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर केली.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

First published: April 23, 2019, 7:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading