दिनेश केळुस्कर,रत्नागिरी, 10 एप्रिल : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. युतीच्या उमेदवारासाठी झालेल्या प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, शरद पवारांची कारकीर्द ही वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सुरू झाली. पवारांची गद्दारीने सुरू झालेली कारकीर्द आहे अशी टीकाही त्यांनी केली. पवारांनी आधी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आणि नंतर पुन्हा त्यांच्याच दारात जाऊन ते याचना करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
काँग्रेस-राष्ट्रवादीला अशा जाहीराती करताना लाज वाटत नाही का? टीका करण्याचा अधिकार आघाडीला नाही.
शिवसेनेने जनतेसाठी युती केली. युतीसाठे लाचारी नाही केली
भाजपासोबत पाच वर्षे संघर्ष झाला पण एकही वैयक्तीक काम घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो नाही.
नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान असतील. त्यांच्याशीवाय समर्थ नेतृत्व दुसरं कुणीही देऊ शकत नाही.
शरद पवार हे पुन्हा वाडगा घेउन सोनिया गांधीच्या दारात उभे राहिले ही लाचारी आहे.
पहले मंदिर फिर सरकार हे बोललो म्हणूनच राम मंदिर निर्माणासाठी हालचाल सुरु झाली.
नेहरुनी स्वातंत्र्याआधी जे देशासाठी केलं त्याबध्दल आदर आहेच. नेहरुंनी जर सावरकरां येवढे हाल सोसल्याचे दाखवा. मी त्याना वीर जवाहरलाल म्हणेन.
नालायक राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतो. सावरकरांवर बोलण्याची काँग्रेसची लायकी नाही.