शिवसेनेला अंगावर घेणारे भाजपचे नेते सध्या अडगळीत?

एकीकडं पक्ष साथ देत नसेल तर विरोधकांवर आक्रमक टीका करायची का? अशी भीती भाजपातील नेत्यांना वाटू लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 08:43 PM IST

शिवसेनेला अंगावर घेणारे भाजपचे नेते सध्या अडगळीत?

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई 31 मार्च :  गेल्या साडेचार वर्षात भाजप-सेना युतीतील  नेते भांड-भांड भांडले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  युती झाली. नेत्यांनी गळ्यात गळे घातले. मात्र  एकेकाळी शिवसेनेला अंगावर घेणारे भाजप नेते सध्या पक्षात अडगळीत पडल्याचं चित्र आहे.

गेल्या साडेचार वर्षात भाजप- शिवसेना केंद्र आणि राज्यात सत्तेत एकत्र असले तरी या दोन्ही पक्षात झालेला संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आहे. दोन्ही पक्षातील  नेते यात आघाडीवर होते. मात्र भाजपातील काही नेत्यांना त्याची किंमत आता मोजावी लागत असल्याचं दिसत आहे.

किरीट सोमय्या

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून  उमेदवारीसाठी आटापिटा करावा लागतोय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जुने राजकीय हिशोब आता चुकते केले जात आहेत अशीच  परिस्थिती पाहायला मिळत आहे.

एकनाथ खडसे

Loading...

सोमय्या यांच्याप्रमाणेच भाजपातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेची झालीय. भाजप-सेना युतीच्या घोडदौडीत खडसे मागे पडल्याचं चित्र आहे.  गेल्या निवडणुकीत युती तुटल्याची घोषणा खडसेंनी  केली होती. त्यामुळं शिवसेनेला खडसेंपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक जवळचे वाटतात.

विनोद तावडे

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार आशिष शेलार आणि विनोद तावडेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. लोकसभा निवडणुकीत  तावडे आणि शेलार युतीच्या प्रचारातून काहीसे बाहेर फेकले गेल्याचं चित्र आहे .एका लेखातून शिवसेनेवर टीका केल्यामुळंचं भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारींची विधानपरिषदची वाट बिकट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र युतीत सगळं काही अलबेल असल्याचा दावा विनोद तावडेंनी केला आहे.

शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या  नेत्यांची ही अवस्था पाहून टोकाची  टीका न करण्याचा धडा आता भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचीही चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...