काँग्रेसच्या नेत्यांना देशद्रोह्यांचा पंतप्रधान व्हायचं का? - उद्धव ठाकरे

काँग्रेसच्या नेत्यांना देशद्रोह्यांचा पंतप्रधान व्हायचं का? - उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी देशद्रोहाविरोधातला कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे.

  • Share this:

वसई , 2 एप्रिल : काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरुन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. काँग्रेसला नेमके काय पाहिजे आहे? काँग्रेसच्या नेत्यांना देशभक्तांचा पंतप्रधान व्हायचं की देशद्रोह्यांचा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला केला आहे. उद्धव ठाकरे वसई येथे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

वसईचे नेते हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता त्यांनी टीका केली. वसई आणि परिसरातली गुंडगिरी अनेक वर्षांपासून वसईकर अनुभवत आहेत आता ही गुंडगिरी चालणार नाही, आता कोणत्याही गुंडाला सहन करायची गरज नाही असंही ते म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या कमालीची एकजुटता आहे. अशी एकजुटता इतर कुठल्याही पक्षांमध्ये दिसत नाही असंही ते म्हणाले.

असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी देशद्राविरोधातला कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावरून काँग्रेसवर टीका होत आहे.  'हम निभाएंगे' असं म्हणत काँग्रेसनं हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. नवी दिल्लीतील अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात अध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

पी. चिदंबरम, मनमोहन सिंग यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.यावेळी झालेल्या भाषणामध्ये रोजगाराचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला, मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसेच 121 ठिकाणांना भेट देऊन जाहीरनामा तयार केल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील जाहीरनाम्यातील काही प्रमुख मुद्यांना आपल्या भाषणामध्ये स्पर्श केला.

First published: April 2, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading