मुंबई, 23 एप्रिल : देशात तिसऱ्या टप्प्यात 114 जागांकरता मतदान पार पडत असून मतदारांमध्ये उत्साह देखील दिसून येत आहे. यामध्ये राज्यातील 14 जागांवरती मतदान पार पडत आहे. राज्यात शिवसेनेनं भाजपशी युती केली आहे. तर, फिर एक बार मोदी सरकार म्हणत भाजपनं पुन्हा सत्ता स्थापण्यासाठी कंबर कसली आहे. सत्ता कुणाची येणार यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'देशात कोणत्याही एका पक्षाचं सरकार न येता ते एनडीएचं येईल' असं म्हटलं आहे. 'आम्ही सर्व एनडीएचे घटकपक्ष असून एनडीएचं सरकार बनवू' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील युतीबाबत संजय राऊत यांनी भाजपशी युती न करण्याच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. पण, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली होती.
Sanjay Raut, Shiv Sena: Jo chitra mere saamne hai, iss desh mein kisi ek party ki satta ab nahi aayegi. satta aayegi NDA ki, hum sab NDA ke allies hain aur NDA ki sarkar banne ja rahi hai. pic.twitter.com/9FPeAumKKD
तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील सर्व 26 जागा तर केरळ येथील सर्व 20 जागांवर मतदान होणार आहे. यासोबत आसाममध्ये 4 जागा, बिहारमध्ये 5 जागा, छत्तीसगडमध्ये 7 जागा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 14 जागा, ओडिशामध्ये 6 जागा, उत्तर प्रदेशात 10 जागा, पश्चिम बंगालमध्ये 5 जागा, गोव्यात 2 आणि दादर नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुरामध्ये प्रत्येक 1-1 जागेचा समावेश आहे.
शिवसेना – भाजप युती
सामनातून सतत टीकेचे बाण चालवणाऱ्या शिवसेनेनं अखेर लोकसभा आणि विधानभेकरता युती केली. लोकसभेकरता शिवसेना 23, भाजप 25 तर विधानसभेकरात मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर उर्वरित जागेवर 50 – 50 टक्के असा फॉर्म्युला ठरला आहे. दरम्यान, राज्यात युतीचा फायदा झाला का? निकालाअंती स्पष्ट होईल.
VIDEO: कॉलर स्टाईलबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांचं डॅशिंग उत्तर