मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालीश, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार - पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालीश, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार - पवार

मोदी हे कायम एकटे राहत असल्याने त्यांना कुटुंबाचं ममत्व माहित नाही असा टोलाही पवार यांनी लगावला.

  • Share this:

मुंबई 10 एप्रिल : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता फक्त एक दिवस राहिलाय. देशभरातला प्रचार शिगेला पोहोचलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'न्यूज18 लोकमत' खास मुलाखत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांवर परखड मतं व्यक्त केली. 'न्यूज18 लोकमत' चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका

या मुलाखतीत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालीश आहेत. त्यांच्या बालसुलभ वागण्याकडे मी दुर्लक्ष करतो. लहान मुलांच्या बोलण्याकडे फारसं गांभार्याने बघायचं नसतं अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

पवार पुढे म्हणाले, फडणवीस यांचे वडील हे माझ्यासोबत विधिमंडळात होते. त्यांच्यासोबत मी कामही केलंय. आता ही मुलं राजकारण करत आहे. मुलांच्या वागण्या बोलण्याकडे फारसं लक्ष द्यायचं नसतं असा टोलाही त्यांनी हाणला.

मोदींना घरपण माहित नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या सभेत सातत्याने शरद पवारांना टार्गेट करत आहेत. त्यावरही पवारांनी या मुलाखतीत भाष्य केलं. पवार म्हणाले, मोदींना पवार कुटुंबांशीवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यांना सर्वच ठिकाणी पवार कुटुंब दिसतं. एकत्र कुटुंबाची ताकद काय असते याची जाणीव आम्हाला आहे.

मोदी हे कायम एकटे राहत असल्याने त्यांना कुटुंबाचं ममत्व माहित नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मोदी माझ्याविषयी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणुकीनंतर एकत्र येणार

विरोधीपक्ष आता जरी वेगवेगळे लढत असले तरी निवडणुकीनंतर ते एकत्र येतील त्याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. भाजपला बहुमत मिळणार नाही असंही ते म्हणाले. विजयसिंहसुद्धा रणजितसिंहांच्या मार्गानं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत

First published: April 10, 2019, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading