नरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार

नरेंद्र मोदी झोपेतही माझं नाव घेत असतील - शरद पवार

शरद पवार यांनी प्रचार सभेत अमित शहा यांना इशारा दिला आहे. शिवाय, नरेंद्र मोदींवर देखील टीका केली आहे.

  • Share this:

बारामती, जितेंद्र जाधव, 20 एप्रिल : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बारामतीत येऊन शरद पवारांनी काय केलं विचारतात. आता पवारांना उपटून टाकू म्हणतात. पण, आता ते काय उपटणार आहेत कोणाला माहित? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहांची खिल्ली उडवली आहे. शिवाय, तुम्ही नको त्या भानगडीत पडू नका. तुम्हाला मोदींची स्तुती करायची आहे. कौतुक करायचं आहे? काही सांगायचं आहे? सांगा. पण, भलतीकडे काही बोट घालू नका. तुम्हाला महागात पडेल असा निर्वाणीचा इशारा यावेळी शरद पवार यांनी दिला. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या. त्यामध्ये त्यांनी मलाच लक्ष्य केलं. मला तर शंका वाटते की झोपेतही शरद पवार, शरद पवार, शरद पवार असं बोलत असतील असा टोला त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'

अमित शहांची उडवली खिल्ली

दौंड तालुक्यातील पाटस येथे महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. काल एक गृहस्थ बारामतीत आले. अमित शहा, त्यांनी पवारांनी काय केलं अशी विचारणा करत पवारांना उपटून टाकू असं म्हटलं. आता ते काय उपटणार आहेत ते माहिती नाही अशा शब्दात शरद पवार यांनी अमित शहा यांची खिल्ली उडवली आहे.

लाव रे तो व्हिडिओ : मुंबईत ऐकू येणार नाही राज यांचा आवाज?

'पंतप्रधान झोपेतही शरद पवार असं बोलत असतील'

देशाच्या पंतप्रधानांनी राज्यात अनेक सभा घेतल्या. प्रत्येक सभेत एक विषय त्यांचा पक्का आहे तो म्हणजे शरद पवार. मला शंका वाटते की रात्री झोपेतही ते शरद पवार, शरद पवार, शरद पवार असं बोलत असतील. एक गोष्ट चांगली आहे की ते एकटेच राहतात. त्यामुळं दुसर्‍यांची काही झोपमोड होत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींना टोला लगावला आहे. सध्या भाजप नेत्यांनी बारामती मतदारसंघावर फारच लक्ष दिलं आहे. सगळ्यांना कौतुक वाटतंय की दिल्लीतून उठावं आणि बारामती मतदारसंघात जावं. सगळा देश या मतदारसंघातल्या जनतेला बघायला येतोय. बाकी कुठे जात नाहीत. पण, त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळेच तालुके दिसत आहेत. कदाचित पवारांचं बोट पकडून आपण राजकारणात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितल्यामुळे दिल्लीतले सगळेच मंत्री येत असावेत. पण, पुन्हा पंतप्रधान काय बोलतील आणि काय करतील याचा आपल्याला भरवसा राहिलेला नसल्याचं पवार यांनी प्रचार सभेत म्हटलंय आहे.

SPECIAL REPORT : मुंबईतील उमेदवारांच्या चिंतेत भर, मतदानावर होऊ शकतो परिणाम!

First published: April 20, 2019, 10:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading