पराभवाच्या भीतीनेच विरोधकांचा EVMवर संशय; भाजपचा आरोप

पराभवाच्या भीतीनेच विरोधकांचा EVMवर संशय; भाजपचा आरोप

'आयोगाने मशिन्स हॅक करण्याचं दिलेलं आव्हान कुठल्याही पक्षाने स्वीकारलं नाही. पण आरोप मात्र कायम ठेवले.'

  • Share this:

मुंबई 23 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा EVM मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि अतिशय गंभीर आरोप केले. इव्हीएम हॅक करता येऊ शकतं. किंवा त्यात तांत्रिक छेडछाड करता येते असा या पक्षांचा दावा आहे. एवढंच नाही तर ईव्हीएम रशियातून नियंत्रित केलं जातं असा आरोप सुद्धा चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. तर फक्त पराभवाच्या भीतीनेच विरोधक हे आरोप करत असल्याचा पलटवार भाजपचे प्रवक्ते अतुल शहा यांनी केलाय. 'न्यूज18 लोकमत'च्या बेधडक कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या चर्चेत राष्ट्रवादीचे नीलेश भोसले, आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, पत्रकार जयंत माईणकर आणि आयटी तज्ज्ञ अनय जोगळेकर यांनी सहभाग घेतला.

आत्ताच पत्रकार परिषद का?

तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना विरोधकांनी पत्रकार परिषद का घेतली असा सवाल अतुल शहा यांनी केला. विरोधकांची ही पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

कायम संशयच

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी मतभेद काही आता पाच वर्षात निर्माण झाले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून त्याविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप सोडला तर सर्वच पक्षांनी त्याविषयी संशय व्यक्त केला आहे. हा संशय दूर झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे नीलेश भोसले यांनी केली.

आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, खरा प्रश्न आहे तो जनतेच्या मनातल्या शंका दूर करण्याचा. आपने दिल्लीतल्या विजयानंतरही ईव्हीएम मशिन्स बद्दल शंका उपस्थित केली होती. मात्र त्या शंका दूर केल्या गेल्या नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

हॅकिंग शक्य नाही

आज मतदानासाठी ज्या मशिन्स वापरल्या जातात त्या अतिशय साध्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आल्या आहेत. इंटरनेट, ब्लु टुथ किंवा इतर कुठलही तंत्रज्ञान यात नसते. त्याच बरोबर हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या मशिन्स हॅक करता येत नाहीत असं मत आयट तज्ज्ञ अनय जोगळेकर यांनी व्यक्त केल.

आव्हान स्वीकारणार

ईव्हीम मिशिन्सवर झालेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने या मशिन्स हॅक करून दाखवा असं आव्हान सर्वच राजकीय पक्षांना दिलं होतं. मात्र कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा तज्ज्ञाने ते आव्हान स्वीकारलं नाही. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत सर्व शंकाची सविस्तर उत्तरंही दिली आहेत.

भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर या मशिन्सचा वापर केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना काही चुका होतात. काही मशिन्स बिघडतात. कुठल्याही पद्धतीचा वापर केला तरी काही त्रुटी राहू शकतात त्याचा अर्थ सर्व यंत्रणार अयोग्य नाही असा निष्कर्ष काढता येत नाही असं निवडणूक आयोगाने याआधी अनेकदा जाहीर केलं आहे. पारंपरिक मतपत्रिकेने मतदान घेणं शक्य नाही असंही आयोगाने जाहीर केलं होतं.

First published: April 23, 2019, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading