मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोकणात शिवसेनेला दणका; रायगडमध्ये केंद्रीय मंत्र्याचा पराभव

कोकणात शिवसेनेला दणका; रायगडमध्ये केंद्रीय मंत्र्याचा पराभव

रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल तटकरे 21 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल तटकरे 21 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल तटकरे 21 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

रायगड, 23 मे :रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल तटकरे हे रायगडमधून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 21 हजार मतांनी पराभव केला. गीतेंचा पराभव हा शिवसेनेला कोकणात बसलेला मोठा दणका मानला जात आहे.

रायगड मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत झाली. पण, यामध्ये सुनिल तटकरे यांनी बाजी मारली. 2014मध्ये अनंत गीते या ठिकाणावरून विजयी झाले होते. पण, 2019मध्ये मात्र सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा 21 हजार मतांनी पराभव केला.

2014 मध्येही चुरस

2014 मध्येही अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या कडवी लढत पाहायला मिळाली होती. अनंत गीतेंना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंना 3 लाख 94 हजार 68 मतं मिळाली. केवळ 2 हजार मतांच्या फरकाने अनंत गीते जिंकले होते. त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर शेकाप होती. या निवडणुकीत शेकापने काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याचा फायदा आघाडीला झाला.

2009 मध्ये अंतुलेंचा पराभव

2009 मध्ये शिवसेनेच्या अनंत गीतेंनी इथे काँग्रेसच्या ए.आर. अंतुलेंचा दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर अनंत गीतेंचं या मतदारसंघावर वर्चस्व होतं. रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर हे विधानसभा मतदारसंघ येतात. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या मुलानं देखील शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता. पण, त्याचा फारसा फायदा शिवसेनेला झालेला दिसत नाही.

VIDEO : ईव्हीएमवरून काँग्रेसच्या उमेदवारचा सुप्रीम कोर्टावर धक्कादायक आरोप

First published: