काँग्रेसच्या दुर्दशेला पक्षातलेच नेते जबाबदार - विखे पाटील

काँग्रेसच्या दुर्दशेला पक्षातलेच नेते जबाबदार - विखे पाटील

'पक्षाच्या होत असलेल्या पडझडीवर बोलणं हे पक्षविरोधी काम नाही.

  • Share this:

मुंबई 2 एप्रिल : राज्यातल्या काँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार आहेत. पक्षात कुरघोडीचं राजकारण असतं अशी कबूली विरोधीपक्ष नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. न्यूज18 लोकमतच्या 'न्यूजरुम चर्चा' या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीने एक जागा सोडली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षात काय सुरू आहे याचा विचार पक्षातल्याच नेत्यांनी केला पाहिजे. सुजयने जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे. त्याने पूर्ण जबाबदारीने तो निर्णय घेतला आहे. गेली तीन वर्ष तो या भागात काम करतो आहे. राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असतं तर आघाडीला झटका बसला नसता.

पार्थ पवारांवर नाव न घेता टीका

विखे पाटील म्हणाले, सुजय विखे हे कतृत्ववान आहेत. ते उत्तम  भाषण करतात. भाषण न करता येण्यासारखे ते काही 24-25 वर्षांचे नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

योग्य वेळी भूमिका घेणार

विखे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्याविषयावर त्यांना प्रश्न विचारला असता विखे पाटील म्हणाले, योग्य वेळी योग्य भूमिका घेणार. पक्षच भूमिका घेणार नसतील तर मलाच भूमिका घ्यावी लागेल. माझ्या मुलाने जी भूमिका घेतली त्याचा मला अभिमान आहे असंही ते म्हणाले.

अहमदनगर ही जागा राष्ट्रवादीला दिल्याने तिथे प्रचार करण्याचा फारसा प्रश्न नाही असंही ते म्हणाले. बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची जबाबदारी घेतो म्हणाले ही चांगली गोष्ट आहे असा टोलाही त्यांनी लगावला. पक्षाच्या होत असलेल्या पडझडीवर बोलणं हे पक्षविरोधी काम नाही असंही ते म्हणाले.

VIDEO: 'तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता?' राहुल गांधी पत्रकारांवर भडकले

First published: April 2, 2019, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading