पुणे 18 एप्रिल : बहुतांश पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला विरोध असला तरी अनेक जण सुरक्षा म्हणून, तर अनेक जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरताना दिसून येतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत पीपल्स युनीयन पार्टीचे उमेदवार रमेश धर्मावत हे चक्क हेल्मेट सक्ती रद्द करावी म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी निवडणूक चिन्ह म्हणून हेल्मेटच निवडलं आहे. यानिमित्तानं पुणेकर फक्त बोलत नाही, तर करूनही दाखवतात हे स्पष्ट झालं आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.