यवतमाळ, 4 एप्रिल : ''निवडणूक आयोग म्हणतं पुलवामा घटनेवर तुम्ही बोलायचं नाही. आम्ही बोलू, करण संविधानानं आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असून आम्ही सत्तेत आलो तर यांना जेलमध्ये पाठवू'' असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला. वंचित आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित सभेच्या मंचावरून त्यांनी हे वक्तव्य केलं. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून लढत असलेल्या वंचित आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी आंबेडकरांची प्रचारसभा यवतमाळे आयोजित करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.