बीड, 1 एप्रिल : ''वडलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी लावणारच'' असं सडेतोड मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. ''आम्ही गरीबी पाहिली नसली तरी आमचे पाय नेहमी जमिनीवरच राहिलेत,'' असा टोलासुद्धा त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. तसंच प्रीतम मुंडेंचं नाव बोगस यादीत लावणाऱ्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.