बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 12 एप्रिल : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे हा भाग दुष्काळात होरपळतो आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या म्हणून उस्मानाबाद जिह्याची ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख मिटविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार'', असं शिवसेना-भाजपाचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर म्हणाले.