• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मी जे सांगतो तेच करतो, आणि जे करतो तेच बोलतो'
  • VIDEO: 'मी जे सांगतो तेच करतो, आणि जे करतो तेच बोलतो'

    News18 Lokmat | Published On: Mar 31, 2019 12:10 PM IST | Updated On: Mar 31, 2019 12:15 PM IST

    नागपूर, 31 मार्च : ''मला एवढ्या मतांनी निवडून द्या की पुन्हा कोणी उमेदवार माझ्यापुढे निवडणूक लढण्यास तयार झाला नाही पाहिजे,'' असं वक्तव्य नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केलंय. तर आपण घराणेशाहीच्या विरोधात असून आमची मुलंबाळ लढली तर मग कार्यकर्त्यांनी काय करायचं असा सवालही त्यांनी केला. ते नागपूरात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. ''यावेळीसुद्धा मी प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. पण माझी मतं दुप्पट करण्याची जबाबदारी ही केवळ तुमची आहे,'' असं ते यावेळी म्हणाले. ''मी कधीच खोटं बोलत नाही. मी जे सांगतो तेच करतो, आणि जे करतो तेच बोलतो,'' असंही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading