'चंद्रकांत पाटील यांचं प्रत्येक वक्तव्य हास्यास्पद, म्हणून ते हसतमुख'

'चंद्रकांत पाटील यांचं प्रत्येक वक्तव्य हास्यास्पद, म्हणून ते हसतमुख'

रोहित हे कायम आपल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत राहतात. शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला नको होती या फेसबुक पोस्ट नंतर ते चर्चेत आले होते.

  • Share this:

पुणे, 31 मार्च : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीय. त्यांच प्रत्येक वक्तव्य हास्यास्पद असतं त्यामुळे त्यांना हसतमुख असं म्हटलं पाहिजे असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रोहित हे कायम आपल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत राहतात. शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला नको होती या फेसबुक पोस्ट नंतर ते चर्चेत आले होते. रोहित यांनी अशी पोस्ट लिहायला नको होती अशी भावना नंतर पार्थ पवार यांनी व्यक्त केली होती.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावरून रोहित पवारांनी ही फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

हसतमुख चंद्रकांत पाटील यांनी काल कोणत्यातरी भाषणात साहेबांवर टिका केल्याचं ऐकण्यात आलं. त्यांच प्रत्येक विधान हसण्यावारी घेण्यासारखं असल्यामुळे त्यांना हसतमुख म्हणावं वाटतं. साहेबांवर टिका करण्यापुर्वी भाजपचे जेष्ठ नेते आणि संपुर्ण भारत ज्यांना मानतो व तुमच्या पक्षाचे नेते ज्यांच्या नावाने कदाचित फक्त राजकारण करतात असे स्व. अटल बिहारी वाजपेयी साहेबांबद्दल काय म्हणालेले ते पहा,

वो दुसरे पक्ष में हैं. महाराष्ट्र से जुडे हुये हें. लेकिन उनका व्यक्तित्व पक्ष की सिमाओं को लांघ जाता हैं. उनका व्यक्तित्व प्रदेशोतक सिमित नहीं कियां जा सकता.

आत्ता विचार करा विकासाचे मुद्दे सोडून तुम्ही कोणतं राजकारण करत आहात.

First published: March 31, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading