पुणे, 18 एप्रिल : पुणे येथे पार पडलेल्या प्रचार सभेत ''सर्व विदेशी पाहुण्यांना गुजरातलाच का नेता? मुंबई-अहमदाबाद मेट्रोचा उपयोग काय? परदेशी अध्यक्षांना मिढी मारून काय मिळालं? स्टार्टअप इंडियाबद्दल मोदी गप्प का?'' असा प्रश्नांचा भडीमार करत राज ठाकरे यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ''मोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका'' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी त्यांनी ''देशाचं तंगडं अडकलय, योगा कसलं करताय?'' असं म्हणत बाबा रामदेव यांच्यावरही सडकून टीका केली.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.