मुंबई, विवेक कुलकर्णी, 04 एप्रिल : लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील राज ठाकरे राज्यभरात सहा प्रचार सभा घेणार आहेत. दरम्यान, यापूर्वीच राज ठाकरे यांनी भाजपला मतदान करू नका असं आवाहन केलं आहे. 2014मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं होतं. तर, आता पाच वर्षानंतर तेच राज ठाकरे मोदींना विरोध करताना दिसत आहे. राज्यातील सोलापूर, नांदेड आणि मावळसह सहा ठिकाणी राज ठाकरेंच्या सभा होणार आहेत. मात्र, या सभांमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार हे व्यासपीठावर असणार नाहीत अशी माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार अशी चर्चा होती. पण, आता उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी देखील राज ठाकरे सभा घेणार नसल्याची माहिती कळतेय.
ये है 'राज'निती
राज ठाकरेंच्या या सभेमध्ये सोलापूर, नांदेड आणि मावळचा समावेश आहे. सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मैदानात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान आहे. तर,नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पार्थ यांच्यासमोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचं आव्हान हे पार्थ यांना आहे. त्यामुळे या लढतींकडे देखील राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे राज यांच्या मोदी विरोधाचा फायदा हा आघाडीला होणार का? हे पाहावं लागणार आहे.
सोलापूर: कम्युनिस्ट पक्षाने दिला आंबेडकरांना पाठिंबा, शिंदेंच्या अडचणीत वाढ होणार?शिंदेंच्या अडचणीत वाढ होणार?
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सीपीआयएम अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सीपीआयएमचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी ही माहिती दिली. डाव्या पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसचे उमेदवार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर, राज ठाकरे आता सोलापुरात देखील सभा घेणार असल्यानं सर्वाचं लक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे लागलं आहे.
VIDEO: कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी एकनाथ शिंदेंनी टोचले पाटलांचे कान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.