• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'राज ठाकरे-वंचित'वर चर्चा, पराभवाच्या धक्क्यानंतर आघाडीमध्ये बैठकसत्र

'राज ठाकरे-वंचित'वर चर्चा, पराभवाच्या धक्क्यानंतर आघाडीमध्ये बैठकसत्र

देशात मोदी त्सुनामीत महाआघाडीचा धुव्वा उडाला, महाराष्ट्रात तर काँग्रेसला फक्त एकच जागा राखता आली.

 • Share this:
  मुंबई, 27 मे : लोकसभा निवडणुकीत देशात एऩडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं तर महाआघाडीला मोठा दणका बसला. संपूर्ण देशात लोकसभेत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्रातच भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या आहेत. राज्यात काँग्रेसच्या फक्त एका उमेदवाराचा विजय झाला आहे. आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेस एनसीपी नेत्यांची मंथन बैठक होणार आहे. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या घरी 28 मे रोजी ही बैठक होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही नांदेडमधून पराभव झाला. अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या 9-10 जागांचे नुकसान केल्याचंही मान्य केलं होतं. लोकसभा निवडणुक निकालानंतर होणाऱ्या या मंथन बैठकीत अशोक चव्हाण, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यात शिवसेना भाजप युतीकड़ून झालेल्या या पराभवावर आघाडीचे नेते एकत्र येऊन मंथन करणार आहेत. आघाडीच्या उमेदवारांना कमी मते का मिळाली? याशिवाय कोणत्या घटकांचा फटका बसला यावर चर्चा होणार आहे. आघाडीला वंचित फॅक्टरचा फटका बसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. त्याप्रमाणे वंचितचा कोणत्या ठिकाणी आणि किती प्रमाणात आघाडीच्या उमेदवाराला फटका बसला यावर चर्चा होणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी सरकारवर सडकून टीका करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा घेतल्या. याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडला यावर मंथन करण्यात येणार असल्याचं समजतं. SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?
  First published: