संदीप राजगोळकर,कोल्हापूर, 7 एप्रिल : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना यावेळी बॅट हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. प्रचाराची सुरुवात होते ना होते तोपर्यंत त्यांच्या बॅट या चिन्हाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी दोन वेळा खासदार झाले त्या शेतकऱ्यांचे शेट्टींप्रती असलेले प्रेम पाहायला मिळालय. एका आठवडी बाजारात एक रुपये कमी द्या पण यावेळी बॅटलाच मतदान करा असा प्रचार या शेतकऱ्याने सुरू केलाय.
त्याचा व्हिडिओच आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वतःच्या शेतातील टोमॅटो आणि वांगी घेऊन हा शेतकरी मार्केट मध्ये आला असून मला एक रुपये कमी द्या पण यावेळी शेट्टींच्या बॅट चिन्हालाच मतदान करा असा हा प्रचार करत आहेत.
आजपर्यंत राजकारण्यांसाठी कार्यकर्ते काहीही करताना पाहायला मिळालं आहे. कोणी साहेब निवडून येत नाही तोपर्यंत अनवाणी चालतोय तर कोणी दंडवत घालताना दिसतोय. पण हा शेतकरी चक्क भाजीला कमी पैसे द्या पण मतदान बॅट ला करा असं सांगतोय. त्यांच्या या प्रचाराचा व्हिडिओ आता कोल्हापुरात चर्चेचा विषय बनला आहे.