जळगावमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी, भाजप उमेदवार बदलणार?

जळगावमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी, भाजप उमेदवार बदलणार?

स्मिता वाघ या भाजप उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार होत्या. मात्र त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेल्या नाही.

  • Share this:

जळगाव, 28 मार्च : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आता स्मिता वाघ यांच्या नावाबाबत भाजपकडून पुनर्विचार केला जातोय की, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

स्मिता वाघ या भाजप उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार होत्या. मात्र त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेल्या नाही. त्यामुळे जळगावात सुरू असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वादामुळे स्मिता वाघ यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दुसरीकडे, मुंबईतही युतीमध्ये कलह सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या सर्व घडामोडींवरून ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे नक्की झाले आहे.

आजचा दिवस सोमय्या यांच्यासाठी अधिकच अडचणीचा ठरला. प्रथम मातोश्रीने त्यांची भेट नाकारली त्यानंतर सुनिल राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल अशी शक्यता आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मिळून घेणार असल्याचे समजते.

SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगात

First published: March 28, 2019, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading