माढा, सागर सुरवसे, 23 एप्रिल : मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस अशीच काहीशी धारणा अनेकांची दिसते. आपला मतदानाचा हक्क न बजावता अनेक जण या दिवशी फिरायला जाणं देखील पसंत करतात. पण, मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माढातील तरूणानं केलेल्या कृतीतून नक्कीच कळून येईल. आयुष्यातील अमोल ठेवा म्हणजे लग्न. या दिवसाला प्रत्येकाच्या आयुष्याच अनन्य साधारण महत्त्व असतं. पण, आधी लगीन लोकशाहीच मग माझं म्हणत माढ्यातील तरूणानं आदर्श उभा केला आहे. विनोद गायकवाड असं या तरूणाचं नाव आहे. आजच्या दिवशी विनोदनं बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत सर्वांपुढे एक आदर्श उभा केला आहे. विनोद गायकवाड हा माढा तालुक्यातील माळेगावचा रहिवासी आहे.
काय म्हणाला विनोद?
यावर बोलताना विनोदनं 'आपलं अमुल्य मत वाया जाऊ देऊ नका' असं आवाहन देखील केलं आहे. विनोदच्या मतदानामुळे मतदानामुळे ग्रामीण भागात मतदानाबाबतच्या जागृतीचा प्रत्यय अनुभवायला येत आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही बाब आनंदाची शिवाय महत्त्वपूर्ण देखील आहे. त्यामुळे तुम्ही देखील मतदान करा आणि लोकशाही बळकट करा!
#KabAurKahan आणि #ButtonDabaoDeshBanao हे हॅशटॅग वापरून तुमचे मतदानानंतरचे फोटो शेअर करा. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे म्हणून @Network18Group चा उपक्रम. Presented by @RP_SanjivGoenka #LokSabhaElections2019 #ElectionsWithNews18 #Elections2019 pic.twitter.com/xZQdRYQUU9
— News18Lokmat (@News18lokmat) April 23, 2019
VIDEO: मतदान केल्याचा पुरावा दाखवा, एकावर एक मिसळ फ्री मिळवा!