पुण्यात रंगणार सामना, काँग्रेसकडून सुरेखा पुणेकर रिंगणात?

पुण्यात रंगणार सामना, काँग्रेसकडून सुरेखा पुणेकर रिंगणात?

'दिल्लीत जाऊन मी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. ते मला कळवणार आहेत. पण मी कुणाला भेटले ते सांगणार नाही.'

  • Share this:

पुणे 29 मार्च : पुण्यातल्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ अजुनही संपेणा. अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी नवेच नाव समोर आले. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. खुद्द रेखा पुणेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत त्यामुळे पुण्यात गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर यांच्यात सामना रंगणार अशी शक्यता आहे.

याबाबत न्यूज18 लोकमतशी बोलताना सुरेखा पुणेकर यांनी खुलासा केलाय. त्या म्हणाल्या, दिल्लीत जाऊन मी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. ते मला कळवणार आहेत. पण मी कुणाला भेटले ते सांगणार नाही. काल पर्यंत काँग्रेसचे महापालिकेतले गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव निश्चित झालं अशी चर्चा होती.

शिंदे यांनी प्रचारही सुरू केला

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलंय पण त्याच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

दिल्लीतून दोन निरिक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यानंतर अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड या तिघांची नावे दिल्लीत पाठविण्यात आली होती. मात्र आता सुरेखा पुणेकर यांचं नाव समोर आल्याने रंगत आणखी वाढणार आहे.

भाजपचा प्रचार सुरू

भाजपने पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. बापट यांनी प्रचाराला सुरुवातही केलीय. मात्र काँग्रेसचा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. पुण्यात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या 14 मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

First published: March 29, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading