'निवडणुकीचे अचूक अंदाज सांगा आणि 21 लाख मिळवा'

'निवडणुकीचे अचूक अंदाज सांगा आणि 21 लाख मिळवा'

अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या या ज्योतिष्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आव्हान दिलंय.

  • Share this:

पुणे 1 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरू झालाय.सगळेच राजकिय पक्ष एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेत आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या विजयाचा अंदाजही व्यक्त करतो. मात्र या पक्षांनी केलेल्या दाव्याला अनेकांचे अंदाज खतपाणीही घालताय. त्यांतच ज्योतिषांनी केलेल्या निकालाच्या दाव्यांनी रंगत आणखी वाढली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या सर्वच दाव्यांना थेट आव्हान दिलंय.

आता अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या या ज्योतिष्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आव्हान दिलंय. अंनिसनं बँकेत 21 लाख फिक्स डिपॉझिट ठेवले असून 25 प्रश्न जाहीर केले आहेत. यातील 22 प्रश्नांचा अचूक अंदाज देणाऱ्या ज्योतिष्याला हे 21 लाख दिले जाणार आहेत.

23 मे रोजी मिळणार नवा पंतप्रधान

2019 मध्ये अस्तित्वात येणारी ही 17 वी लोकसभा आहे. 3 जून रोजी 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्या आधी नवं सरकार स्थापन होणं गरजेचं आहे. सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी 23 मे रोजी होणार असून देशाचा नवा पंतप्रधान कोण होणार हे त्याच दिवशी निश्चित होणार आहे.

2014 मध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्या आधी त्यांनी वर्षभर झंझावती दौरे करून आपली लाट निर्माण केली होती. अनेक दृष्टिनं ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा मिळवून भाजपने इतिहास रचला तर सहा राज्यांमध्ये सर्वच्या सर्व जागा पटाकावल्या होत्या. मात्र 2019 मध्ये ती लाट राहिली नाही याची जाणीव भाजपलाही झाली आहे. पंतप्रधान मोदी सर्व शक्ती लावत पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करताहेत. तर काँग्रेसनेही कंबर कसलीय.

2019 ची निवडणुक एकतर्फी होईल असं वर्षभरापूर्वी वाटत होतं मात्र राहुल गांधी यांनी आक्रमक होत काँग्रेसमध्ये जान आणली. राफेल सारखा मुद्दा घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेरीस आणलं. त्यामुळे NDA आणि UPA मध्ये जोरदार लढत होणार आहे.

सात टप्प्यांमध्ये निवडणूक

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीचं अखेर रविवारी बिगुल  वाजलं. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली असून देशात 7   टप्प्यात मतदान होणार आहेत.  तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. 3 जून रोजी 16 व्या लोकसभेची मुदत संपत असून त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे.

निवडणुकांच वेळापत्रक घोषीत झाल्यावर लगेच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या चारसंहितेचं पालन सर्व राजकीय पक्षांना करणं बंधन कारक आहे. EVM नेच मतदान होणार असून यावेळी मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त VVPAT मशिन्स लावण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

First Published: Apr 1, 2019 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading