माझं राजकीय वजन वाढलं म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागलं-धनंजय मुंडे

माझं राजकीय वजन वाढलं म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागलं-धनंजय मुंडे

दोन्ही बहिणींना दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळी सत्ता असतां काहीच करता आले नाही. या भगिनीं एवढ्या निष्क्रिय आहेत की वैद्यनाथ कारखान्यावर दिला 600 कोटीचे कर्ज करुन ठेवलं.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 10 एप्रिल : धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच कलगीतुरा रंगतोय. पंकजा मुंडे यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पलटवार केलाय.  माझं राजकीय वजन वाढलं त्यामुळेच बहिणीच्या पोटात दुखू लागलं असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावलाय.

धनंजय मुंडे म्हणाले, निवडणुकीआधी मी कष्टानं माझ शरीरिक वजन कमी केले. लोकसभेचा आणि त्याचा काय संबंध. पण प्रचार सभेत माझ्या वजनाचा विषय येत आहे. पण माझं राजकीय वजन वाढल म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागले, कळा निघायला लागल्या आहेत असंही ते म्हणाले.

सरकारला अंगावर घेतलं

मला पक्षाने विश्वास टाकून जबाबदारी दिली. माझं काम तुम्ही पाहिले सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारशी दोन हात केले. त्यामूळे मी माझं नाव कमावलं. पण काहींच्या पोटात दुखायला लागलं. राष्ट्रवादी -काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी केज तालुक्यांतील नांदूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

म्हणून अन्याय करणार का?

माझा जन्म मुंडे साहेबांच्या पोटी झाला नाही म्हणून अन्याय करणार का? पंडित अण्णानी लहान भावला मोठं करण्यासाठी अख्खी हयात घालवली त्यांच्या मुलांवर अन्याय करणार कां?  दोन बहिणींनी सत्तेत असतांना काय दिलते सांगा नंतर मतदान करा असंही ते म्हणाले.

निष्क्रिय भगिनी

दोन्ही बहिणींना दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळी सत्ता असतां काहीच करता आले नाही. या भगिनीं एवढ्या निष्क्रिय आहेत की वारसा हक्काने मिळालेल्या वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवलं. पालकमंत्री पंकजाताई म्हणायच्या की वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथ मुंडेचा आत्मा आहे. त्यांच कारखान्याच्या जागेवर गोपीनाथ गड आहे.

आज शेतकऱ्यांचे पैसे थकवले म्हणून ज्या सरकार मध्ये त्या मंत्री आहेत त्यांच राज्य सरकार ने कायद्यानुसार कारखान्यावर जप्ती आणली परिणामी ही जप्ती स्व.मुंडे साहेबांच्या आत्म्यावर जप्ती आणली. हा त्यांचा अपमान नाही कां? अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

First published: April 10, 2019, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading