उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज, काँग्रेस कार्यालयातील 300 खुर्च्या नेल्या

उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज, काँग्रेस कार्यालयातील 300 खुर्च्या नेल्या

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी 'गांधीभवन' या कार्यालयात महाआघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह एक बैठक आयोजित केली होती. अगदी त्याचवेळी सत्तार समर्थकांसोबत तिथे पोहचले आणि त्यांनी कार्यालयातल्या सगळ्या खुर्च्या उचलल्या.

  • Share this:

औरंगाबाद, 27 मार्च : लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेते नाराज झाल्याच्या आणि पक्ष सोडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही रोज वाचत असालच. पण यात एक अजब प्रकार समोर आला आहे. लोकसभेची उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेस पक्षातील एका नेत्याने थेट ऑफिसमधल्या खुर्च्य़ा घेऊन गेले.

लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी समर्थकांच्या मदतीने मंगळवारी पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून 300 खुर्च्या उचलल्या. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आहे. मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कार्यालयातील माझ्या खर्चातून आणलेल्या खुर्च्या मी घेऊन जात असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी 'गांधीभवन' या कार्यालयात महाआघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह एक बैठक आयोजित केली होती. अगदी त्याचवेळी सत्तार समर्थकांसोबत तिथे पोहचले आणि त्यांनी कार्यालयातल्या सगळ्या खुर्च्या उचलल्या.

पण, ऐन बैठकीवेळी खुर्च्या गायब झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेतली. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते सत्तार यांना आशा होती की त्यांना पक्षाकडून लोकसभेचं तिकिट मिळेल पण त्यांच्या जागेवर विधान परिषद सदस्य सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सत्तार पक्षावर नाराज झाले आणि त्यांनी पक्ष सोडला.

सत्तार म्हणाले की, 'या खुर्च्या माझ्या आहेत. काँग्रेसच्या बैठकांसाठी मी त्या कार्यालयात ठेवल्या होत्या. पण आता मी पक्ष सोडला आहे. त्यामुळे माझ्या खुर्च्या मी घेऊन जात आहे.'

दरम्यान, हे सगळं अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया झांबड यांनी दिली आहे. 'गरज असल्यामुळे त्यांनी खुर्च्या नेल्या. पण आम्ही नाराज नाही आहोत. सत्तार हे अजुनही काँग्रेसमध्ये आहेत. कारण त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आला नाही' असं सुभाष झांबड म्हणाले आहेत.

VIDEO: 'मी सुद्धा बारामतीचीच लेक आणि दौडची सून'

First published: March 27, 2019, 7:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading