पूनम महाजनांच्या संपत्तीमध्ये घट, आकडा पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!

पूनम महाजनांच्या संपत्तीमध्ये घट, आकडा पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!

भाजप खासदार पूनम महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये नेत्यांच्या संपत्तीवरून आरोप - प्रत्यारोप सुरू आहे. कोणत्या नेत्याची संपत्ती कशा रीतीनं वाढली आणि किती पटीनं वाढली याबद्दल आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पण, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात श्रीमंत ठरलेल्या मुंबईतील भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये मात्र तब्बल 106 पटींनी घट झाली आहे.

विश्वास नाही ना बसत? पुनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांची 2014मध्ये 108 कोटी रुपयांची असलेली संपत्ती 2019मध्ये 2 कोटी 20 लाखांवर आली आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे घर, जमीन, सोने काहीही नसल्याचे महाजन यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

पूनम महाजनांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पूनम महाजन यांनी उत्तर - मध्य मुंबईतून भाजपतर्फे शुक्रवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी भव्य मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन देखील केलं. त्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक, माऊंट मेरी, माहीम दर्गा येथे जाऊन आशीर्वाद  घेतले. 2009मध्ये पूनम महाजन यांनी घाटकोपरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे 20 कोटींची मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं.

तर,2014मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी 108 कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं. यामध्ये त्यांची आणि पतीची देखील संपत्ती होती. शिवाय, 41 कोटी रूपयांचं कर्ज असल्याचं देखील प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं.

पण, आता 2014 ते 2019 या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये 106 टक्क्यांनी घट झाल्याचं म्हटलं आहे. पूनम महाजन आणि त्यांचे पती वजेंडला राव यांनी 2014 ते 2018 या वर्षांमध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 69.44 लाखावरून 10 लाख आणि पतीचे वार्षिक उत्पन्न 1.72 कोटी रूपयावरून एक लाख रूपयापर्यंत घसरल्याचं म्हटलं आहे.

VIDEO: प्रचारादरम्यान पार्थ पवार भजनात झाले तल्लीन

First published: April 6, 2019, 9:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading